Deprecated: Function WP_Dependencies->add_data() was called with an argument that is deprecated since version 6.9.0! IE conditional comments are ignored by all supported browsers. in /home/x5zz1zyaiadw/public_html/wp-includes/functions.php on line 6131
केंद्रीय आरोग्य मंत्री पतंजलीच्या कोरोनीलवरून IMA च्या निशाण्यावर - Maharashtra 24

केंद्रीय आरोग्य मंत्री पतंजलीच्या कोरोनीलवरून IMA च्या निशाण्यावर

Spread the love

Loading

महाराष्ट्र 24 । विशेष प्रतिनिधी । दि.२३। नवीदिल्ली । पतंजली निर्मित कोरोनील औषधाला केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी जागतिक आरोग्य संघटनेची मान्यता असल्याचे सांगितल्याने आय एम ए संघटनेने आश्चर्य व्यक्त केले आहे. कोरोनील औषधाचे ट्रायल कधी झाली , या औषधाला वैज्ञानिक अधिष्ठान काय ? शिवाय स्वतः डॉक्टर असलेल्या आरोग्य मंत्र्यांनी कोणत्या आधारावर कोरोनील औषधाला मान्यता देत असल्याचा सवाल ही केंद्रीय इंडियन मेडिकल असोसिएशन कडून उपस्थित करण्यात आला आहे.

रामदेव बाबा यांच्या पतंजली औषध निर्माण केलेल्या कंपनीने कोरोनील या औषधाची निर्मिती केली असून हे औषध कोरोनावर उपचार करणारे असल्याचा दावा केला आहे . पतंजलीने केलेल्या या दाव्याला केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांनी समर्थन दिले आहे . शिवाय जागतिक आरोग्य संघटनेने कोरोनील औषधाला मान्यता दिली असल्याचेही हर्षवर्धन यांनी सांगितले . मात्र यावर बोलताना इंडियन मेडिकल असोसिएशनचे जनरल सेक्रेटरी डॉ. जयेश लेले यांनी सांगितले कि , जागतिक आरोग्य संघटनेने संघटनेच्या होम ट्विट वर कोणत्याही पारंपरिक पद्धतीच्या औषधाला संघटनेने प्रमाणित केले नाही असे स्पष्ट म्हटले आहे. या उलट कोरोनीलच्या ट्रायल बाबत पतंजली कंपनीने किंवा कोणीही काही स्पष्टीकरण दिले नसल्याचे हि ते म्हणाले .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *