1 लाखाच्या गुंतवणुकीवर महिन्याला मिळेल उत्तम परतावा ; Post Office ची जबरदस्त योजना

Spread the love

Loading

महाराष्ट्र 24 । विशेष प्रतिनिधी । दि.२३। नवीदिल्ली । गुंतवणुकीसाठी पोस्ट ऑफिस हा उत्तम पर्याय मानला जातो. इथं तुम्हाला चांगलं उत्पन्नही मिळतं. आज, आम्ही तुम्हाला पोस्ट ऑफिसच्या अशात एका बचत योजनेबद्दल सांगणार आहोत. ज्यामध्ये तुम्हाला वार्षिक 6.6 टक्के उत्पन्न मिळतं. या योजनेत तुम्हाला एकरकमी रक्कम जमा करावी लागेल आणि त्यावरून तुम्हाला मासिक व्याज उत्पन्न मिळेल. यामध्ये वैयक्तिक योगदानकर्ते साडेचार लाखांपर्यंत गुंतवणूक करू शकतात. तर जॉईंट खात्यात 9 लाखांपर्यंत गुंतवणूक करता येते. (investment plan post office monthly income scheme gives 6 6 percent interest payable monthly)

पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजना असं या योजनेचं नाव आहे. या योजनेचा लॉक-इन कालावधी 5 वर्षांचा आहे. यामध्ये पॉलिसी मॅच्यूअर झाल्यानंतर तुम्हाला पूर्ण पैसे मिळतील. या योजनेचं वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये तुम्हाला मासिक व्याज मिळतं. चांगाल रिटर्न मिळतो. 10 वय झाल्यानंतर या पॉलिसीचा तुम्हाला जास्त फायदा मिळतो. अल्पवयीन व्यक्तीच्या नावेही योजनेचा लाभ घेऊ शकतात. या योजनेंतर्गत किमान 1 हजार रुपये आणि जास्तीत जास्त साडेचार लाख रुपयांची गुंतवणूक करता येते. गुंतवणूकीची रक्कम 100 च्या एकाधिक असणे आवश्यक आहे.

1 लाख गुंतवणुकीसाठी दरवर्षी मिळतील 6600 रुपये

या योजनेत गुंतवणूक केली तर साधं व्याज मोजलं जातं. तुम्ही 1 लाख रुपये गुंतवले तर तुम्हाला एका वर्षामध्ये 6600 रुपये आणि दरमहा 550 रुपये मिळतील. म्हणजेच पाच वर्ष दरमहा भेटत राहतील. 2 लाख रुपयांच्या गुंतवणूकीवर 1100 रुपये महिन्याला 13200 रुपये आणि पाच वर्षांत एकूण 66000 रुपये मिळतील. 3 लाख गुंतवणूकीसाठी तुम्हाला 1650 रुपये, 4 लाखांच्या गुंतवणूकीसाठी तुम्हाला 2200 रुपये आणि साडेचार लाख रुपये गुंतवणूकीसाठी 2475 रुपये मिळतील. एका वर्षात 29700 रुपये आणि पाच वर्षात 1 लाख 48 हजार 500 रुपये मिळतील.

सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या योजनेत जर एक वर्षानंतर आणि तीन वर्षांआधी गुंतवणूक मागे घेतली गेली तर 2% कपात केली जाईल. तीन वर्षानंतर आणि पाच वर्षांआधी खातं बंद केलं तर 1 टक्के कपात केली जाईल. (investment plan post office monthly income scheme gives 6 6 percent interest payable monthly)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *