पिंपरी चिंचवड : आकुर्डीत कपड्याच्या दुकानाला आग; वृद्ध महिलेचा होरपळून मृत्यू

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – पिंपरी चिंचवड – दि. २३ – आकुर्डी येथे एका कपड्याच्या दुकानाला भीषण आग लागली. यामध्ये एका वृद्ध महिलेचा होरपळून मृत्यू झाला. ही घटना पहाटेच्या सुमारास घडली. भारती नंदलाल सारडा (वय ७०) असे मृत्यू झालेल्या वृद्ध महिलेचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आकुर्डी येथील म्हाळसकांत चौकाजवळ सारडा क्लॉथ सेंटर आहे. भारती सारडा यांच्या पतीचे निधन झाल्यानंतर त्या दुकानातच राहत होत्या. दरम्यान, आज (मंगळवार) पहाटेच्या सुमारास दुकानाला अचानक आग लागली. यामध्ये भारती यांचा होरपळून मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच वल्लभनगर मुख्य केंद्र, प्राधिकरण उपकेंद्र, तळवडे उपकेंद्र यांचे तीन बंब घटनास्थळी दाखल झाले. आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही. तपास निगडी पोलिस करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *