2027 वर्ल्ड कपआधीच रोहित शर्माचं कर्णधारपदही गेलं; ‘हा’ खेळाडू भारताचा झाला नवा कॅप्टन!

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ | विशेष प्रतिनिधी | दि. ४ ऑक्टोबर | भारतीय क्रिकेटमध्ये मोठा बदल घडण्याची चिन्हे दिसत होती. वेस्ट इंडिजविरुद्धची कसोटी मालिका संपल्यानंतर टीम इंडिया ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर जाणार आहे. 19 ऑक्टोबर ते 8 नोव्हेंबर या कालावधीत भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये तीन वनडे आणि पाच टी20 सामन्यांची मालिका होणार आहे. पण या दौऱ्यापूर्वीच टीम इंडियाच्या नेतृत्वाबाबत मोठी बातमी समोर आली आहे. माहिती अशी की, वनडे कर्णधार म्हणून रोहित शर्मा नव्हे तर शुभमन गिलचे नाव पुढे येत होते. अजित आगरकर यांच्या अध्यक्षतेखालील निवड समिती आज ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी संघाची घोषणा केली. त्याआधीच शुभमन गिलचं नाव चर्चेत होतं. 26 वर्षीय गिलने कसोटी क्रिकेटमध्ये आपली धडाकेबाज कामगिरी सिध्द केली असून, आता त्याला वनडे नेतृत्वाची संधी मिळाली आहे.

शुभमन गिल नवा कर्णधार
रोहित शर्मा आणि विराट कोहली हे या मालिकेत खेळणार असले तरी वनडे संघाचे नेतृत्व गिलकडे सोपवण्यात आले आहे. गिलला भारतीय क्रिकेटचा पुढचा सुपरस्टार मानलं जातं. रोहित सध्या 37 वर्षांचा आहे आणि 2027 वर्ल्ड कपपर्यंत त्याचे वय 40 ओलांडणार आहे. त्यामुळे दीर्घकालीन नेतृत्वाच्या दृष्टीने सेलेक्टर्स गिलकडे पाहत आहेत.

रोहित शर्मा डिसेंबर 2022 पासून भारताचा फुलटाईम वनडे कर्णधार आहे. त्याच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया 2023 विश्वचषकाच्या अंतिम फेरीत पोहोचली होती, जिथे ऑस्ट्रेलियाविरुद्ध पराभव पत्करावा लागला. तरीदेखील त्या स्पर्धेत भारताने सलग 10 विजय मिळवले होते. शिवाय, रोहितच्या कर्णधारपदाखाली भारताने 2024 टी20 वर्ल्ड कप आणि 2025 चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकत अजेय कामगिरी केली.

2027वर्ल्ड कपसाठी तयारी
निवड समितीचे मत आहे की 2027 च्या वनडे विश्वचषकापर्यंत शुभमन गिलला नेतृत्वाचा अनुभव देऊन तयार करावे. यासंदर्भात सेलेक्टर्सनी मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर, रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांच्याशी चर्चा केली असल्याचेही कळते.

ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारताची वनडे टीम
ऑस्ट्रेलियाविरुद्ध 19 ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या तीन वनडे सामन्यांच्या मालिकेसाठी जाहीर केलेला भारतीय संघ –

शुभमन गिल (कर्णधार)
रोहित शर्मा
विराट कोहली
श्रेयस अय्यर (उपकर्णधार)
अक्षर पटेल
केएल राहुल (यष्टीरक्षक)
नीतीश कुमार रेड्डी
वाशिंगटन सुंदर
कुलदीप यादव
हर्षित राणा
मोहम्मद सिराज
अर्शदीप सिंह
प्रसिद्ध कृष्णा
ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक)
यशस्वी जायसवाल
ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारताची टी20 टीम
पाच सामन्यांच्या टी20 मालिकेसाठी टीम इंडियाची संघरचना अशी आहे –

सूर्यकुमार यादव (कर्णधार)
अभिषेक शर्मा
शुभमन गिल (उपकर्णधार)
तिलक वर्मा
नीतीश कुमार रेड्डी
शिवम दुबे
अक्षर पटेल
जितेश शर्मा
वरुण चक्रवर्ती
जसप्रीत बुमराह
अर्शदीप सिंह
कुलदीप यादव
हर्षित राणा
संजू सॅमसन (यष्टीरक्षक)
रिंकू सिंह
वाशिंगटन सुंदर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *