महाराष्ट्र २४ | विशेष प्रतिनिधी | दि. ४ ऑक्टोबर | दिवाळी हा सण हिंदू धर्मात महत्वाचा आहे. दिवाळी सणाची सर्वजण आतुरतेने वाट पाहत असतात. दिवाळी म्हणजेच दिव्यांचा सण मानला जातो. हा दिवस पाच दिवस साजरा केला जातो. कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या तेराव्या दिवशी सुरू होतो आणि कार्तिक महिन्याच्या शुद्ध पंधरवड्याच्या दुसऱ्या दिवसापर्यंत चालू राहतो. या पाच दिवसांमध्ये धनत्रयोदशी, वसूबारस, लक्ष्मीपूजन कधी आहे हे जाणून घेऊया.
दिवाळी किंवा लक्ष्मीपूजन हा पाच दिवसांच्या दिपत्सोवातील सर्वात महत्वाचा दिवस मानला जातो. या वर्षी दिवाळी 20 ऑक्टोबर २०२५ रोजी साजरी केली जाईल. दरवर्षीप्रमाणे, दिवाळीच्या तारखेबद्दल गोंधळ आहे. दिवाळी 20 ऑक्टोबर रोजी येईल की २१ ऑक्टोबर रोजी येईल असा प्रश्न लोकांना पडला असेल तर ही बातमी शेवटपर्यंत नक्की वाचा.
पंचांगानुसार दिवाळी कार्तिक महिन्यातील अमावस्येच्या दिवशी साजरी केली जाते. कार्तिक महिन्यातील अमावस्येची तारीख 20 ऑक्टोबर रोजी दुपारी 3:44 वाजता सुरू होते आणि 21 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 5:54 पर्यंत चालते. दिवाळीला सूर्यास्तानंतर लक्ष्मीपूजन केले जाते. त्यामुळे या वर्षी दिवाळी 20 ऑक्टोबर म्हणजेच सोमवारी साजरी केली जाईल.
लक्ष्मी पूजनाचा मुहूर्त
20 ऑक्टोबर रोजी लक्ष्मीपूजनाचा शुभ मुहूर्त संध्याकाळी 7:08 ते 8:18 पर्यंत आहे. या दिवशी प्रदोष काल संध्याकाळी 5:46 ते 8:18 पर्यंत असेल. या शुभ मुहूर्तावर तुम्ही लक्ष्मीची पूजा करू शकता. बरेच लोक या दिवशी लक्ष्मी आणि गणेशाच्या मूर्ती स्थापित करतात.
17 ऑक्टोबर वसूबारस
यंदा १७ ऑक्टोबर रोजी वसूबारस साजरी केली जाणार आहे. या दिवशी गायींची पूजा केली जाते. हा दिवीळीचा पहिला दिवस आहे.
18 ऑक्टोबर धनत्रयोदशी
धनत्रयोदशी १८ ऑक्टोबर २०२५ रोजी असेल. धनत्रयोदशी हा पाच दिवसांच्या उत्सवाची सुरुवात आहे. खरेदी आणि लक्ष्मी आणि कुबेराची पूजा या दिवसाचे केंद्रबिंदू आहे. धनत्रयोदशीच्या दिवशी खरेदीसाठी शुभ वेळ 18 ऑक्टोबर रोजी दुपारी 12:18 ते 19 ऑक्टोबर रोजी दुपारी 1:51 पर्यंत असेल.
19 ऑक्टोबर दीपदान
19 ऑक्टोबरला दिपदान साजरा केला जाणार आहे.
20 ऑक्टोबर नरक चतुर्थी (दिपावली)
नरक चतुर्दशी सोमवार 20 ऑक्टोबर 2025 रोजी असणार आहे. याला छोटी दिवाळी किंवा रूप चौदस असेही म्हणतात. नरक चतुर्दशीला, तीळ आणि तेलाची पेस्ट लावून स्नान करण्याची परंपरा आहे.
21 ऑक्टोबर लक्ष्मीपूजन
दिवाळीचा सण सोमवार, 21 ऑक्टोबर 2025 रोजी साजरा केला जाईल. दिवाळीच्या संध्याकाळी लोक त्यांच्या घरांत पणत्या लावतात. तसेच आनंद आणि समृद्धीसाठी गणेश आणि लक्ष्मीची पूजा करतात.
22 ऑक्टोबर दीपावली पाडवा-बालिप्रतिप
यंदा बुधवार 22 ऑक्टोबर 2025 रोजी कार्तिक शुक्ल पक्षाच्या प्रतिपदा तिथीला साजरी केली जाईल. याला दिपावली पाडवा असेही म्हणतात.
23 ऑक्टोबर भाऊबीज
भाऊबीज गुरुवार, 23 ऑक्टोबर 2025 रोजी कार्तिक शुक्ल पक्षाच्या द्वितीये तिथीला असेल. भाऊबीज हा भाऊ आणि बहिणीमधील अतूट प्रेम आणि पवित्र बंधनाचा सण आहे. या दिवशी बहीण तिच्या भावाचे रक्षण करण्यासाठी त्याला टिळा लावतात.
डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.