कर्णधार विराट कोहली या कसोटी मध्ये धोनीला मागे टाकू शकतो

Spread the love

महाराष्ट्र 24 । विशेष प्रतिनिधी । दि.२३। अहमदाबाद । इंग्लंडविरुद्ध भारतीय संघ डे-नाइट कसोटी सामना खेळणार आहे. टीम इंडिया तिसरी आणि घरच्या मैदानावर दुसरी डे-नाइट टेस्ट खेळणार आहे. ही सामना भारताचा जलद गोलंदाज इशांत शर्मासाठी खास ठरणार आहे. कारण तो त्याचा १००वा कसोटी सामना आहे. या शिवाय भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली ( virat kohli)ला एक मोठा विक्रम स्वत:च्या नावावर करण्याची संधी आहे.मोटेरा मैदानावर होणाऱ्या डे-नाइट कसोटीत विजय मिळवल्यास तो कर्णधार म्हणून विराटने मिळवलेला २२वा विजय असेल. सध्या भारतात कसोटीत सर्वाधिक २१ विजयाचा विक्रम धोनीच्या नावावर आहे. या सामन्यात विराट कोहलीला धोनीला मागे टाकण्याची संधी आहे.

धोनीने भारतातील ३० कसोटी सामन्यात २१ विजय मिळून दिले आहेत. तर विराटने २८ कसोटीत २१ विजय मिळवले आहे.

चेन्नइत झालेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात विजय मिळून विराटने धोनीच्या विक्रमाशी बरोबरी केली होती. तिसऱ्या कसोटीत विजय मिळवल्यास विराटला ऑस्ट्रेलियाचा दिग्गज कर्णधार स्टीव्ह वॉच्या विक्रमाशी बरोबरी करण्याची संधी आहे. वॉने घरच्या मैदानावर २२ कसोटी सामने जिंकले आहेत. घरच्या मैदानावर सर्वाधिक कसोटी सामने जिंकण्याचा विक्रम दक्षिण आफ्रिकेच्या ग्रॅमी स्मिथच्या नावावर आहे. त्याने ५३ पैकी ३० कसोटीत विजय मिळवले आहेत. तर रिकी पॉन्टिंग ३९ पैकी २९ विजयासह दुसऱ्या क्रमांकावर आहे.

वेस्ट इंडिजविरुद्ध २०१९मध्ये दोन सामन्यांची कसोटी मालिका जिंकून विराट धोनीनंतरचा दुसरा यशस्वी कर्णाधार ठरला होता. विराट सध्या कसोटीमधील भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार आहे. त्याने ५८ पैकी ३४ सामन्यात विजय मिळवला आहे.

कसोटीत सर्वाधिक विजय मिळवणारे कर्णधार

ग्रॅमी स्मिथ- ५३ विजय
रिकी पॉन्टिंग- ४८ विजय
स्टीव्ह वॉ- ४१ विजय
क्लाइव्ह लॉईड- ३६ विजय
विराट कोहली- ३४ विजय

इंग्लंडविरुद्धच्या उर्वरित दोन कसोटीत विजय मिळवल्यास अथवा दोन पैकी एकात विजय आणि एक ड्रॉ केल्यास भारतीय संघ आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये पोहोचू शकतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *