कोरोना पासून बचाव करण्यासाठी असा करा मास्कचा वापर ; तज्ज्ञांनी दिली उपयुक्त माहिती

Spread the love

Loading

महाराष्ट्र 24 । विशेष प्रतिनिधी । दि.२४। मुंबई । कोरोनाचे रुग्ण पुन्हा वाढू लागले आहेत. त्यातच Coronavirus च्या नव्या स्ट्रेनचा धोका आहे. घरातून बाहेर पडताना मास्क घातलाच पाहिजे. पण तो कसा? यावर सेंटर ऑफ डिसीझ अँड प्रिव्हेन्शन (CDS) च्या तज्ज्ञांनी उपयुक्त माहिती दिली आहे..सीडीसीनं कोरोनाच्या नव्या स्ट्रेनपासून बचावासाठी मास्कला अधिक सक्षम बनवण्यास काही सूचना दिल्या आहेत.कोरोनापासून वाचण्यासाठी बाजारात मास्कचे अनेक डिझायनर पर्याय उपलब्ध आहेत. मात्र मास्कची फिटिंग, साहित्य, गुणवत्ता आणि श्वास घेण्याची क्षमता तपासूनच मास्क विकत घ्या.

CDC च्या म्हणण्यानुसार सर्जिकल मास्कवर कपड्याचा मास्क लावण्याचा प्रयत्न करा. यामुळे व्हायरस सहजासहजी तुमच्याआत प्रवेश करू शकणार नाही.
CDC च्यानुसार, दोन डिस्पोजेबल मास्क एकावर एक घालणं योग्य नाही.
– CDC च्या नुसार, मास्क बनवण्यासाठी नेहमीच कपड्यांच्या घड्यांनी बनलेला लेअर्ड क्लॉथ मास्कच घाला. लक्षात ठेवा, मास्कचं मटेरियल चांगलं असलं पाहिजे.-
– CDC नुसार, जेव्हा तुम्ही दुहेरी मास्क कॅरी कराल तेव्हा या गोष्टीचा विचार ठेवाल, की बाहेरच्या कपड्याचा मास्कनं तुमच्या सर्जिकल मास्कच्या कडांना दाबलेलं असेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *