बेजबाबदार मंत्री संजय राठाेड; मुख्यमंत्र्यांच्या मोहिमेचा फज्जा उडवत फिजिकल डिस्टन्सिंगचा बोऱ्या, मुख्यमंत्र्यांकडून गंभीर दखल

Spread the love

Loading

महाराष्ट्र 24 । विशेष प्रतिनिधी । दि.२४। वाशीम ।पूजा चव्हाण आत्महत्येनंतर विजनवासात गेलेले वनमंत्री संजय राठोड अखेर मंगळवारी पोहरादेवी येथे जनता आणि प्रसारमाध्यमांसमोर प्रकट झाले. यवतमाळसह राज्यभरात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. खुद्द मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राजकीय नेत्यांना गर्दी टाळण्याचे आवाहन करून ‘मी जबाबदार’ मोहीम सुरू केली आहे. मात्र मुख्यमंत्र्यांच्या मोहिमेचा फज्जा उडवत राठोड यांनी हजारो समर्थकांसह ‘बेजबाबदारी’चे प्रदर्शन केले.

राठोड यांनी कुटुंबीयांसह माता जगदंबादेवी व संत सेवालाल महाराज संत रामराव महाराज यांच्या समाधिस्थळी, बबनलाल महाराज मंदिरात दर्शन घेतले. या वेळी हजारो समर्थक विनामास्क होते. शिवाय प्रचंड गर्दी झाल्याने फिजिकल डिस्टन्सिंगचाही बोऱ्या वाजला. दरम्यान, या बेजबाबदारपणाची मुख्यमंत्र्यांनी तत्काळ गंभीर दखल घेतली. कोविडच्या काळात आरोग्याचे नियम न पाळता गर्दी होत असेल तर संबंधितांवर जिल्हा व पोलिस प्रशासनाने तत्काळ कारवाई करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर मानोरा पोलिस ठाण्यात ८-१० हजार लोकांविरोधात गुन्हा दाखल केला असल्याचे जिल्हा पोलिस अधीक्षक वसंत परदेशी यांनी जाहीर केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *