सर्वोच्च दरांच्या तुलनेत सोने 16 टक्क्यांनी घसरले, गुंतवणुक करण्याची योग्य वेळ ?

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी – मुंबई – दि. २४ – गेल्या वर्षी अर्थात 2020मध्ये सोन्याने 30 टक्के इतका चांगला परतावा दिला होता. ऑगस्ट 2020मध्ये सोन्याची किंमत प्रति दहा ग्रॅम 56200 रुपयांपर्यंत (आतापर्यंतची सर्वोच्च पातळी) पोहोचली होती, जी आता 46800च्या पातळीवर आहे. सर्वोच्च दरांच्या तुलनेत सोने 16 टक्क्यांनी घसरले आहे. अशा परिस्थितीत गुंतवणुक करण्याची हीच योग्य वेळ आहे का?, हा प्रश्न गुंतवणूकदारांसाठी महत्त्वाचा ठरतो. शेअर बाजार देखील 52500च्या पातळीवर पोहोचल्यानंतर करेक्शन मोडमध्ये आहे. सध्या तो 49900 रेंजमध्ये ट्रेड करत आहे. तज्ज्ञांच्या मते, बाँड यील्डमध्ये वाढ झाल्यामुळे महागाईचा दर वाढण्याची अपेक्षा आहे आणि शेअर बाजारामध्ये आणखी काही सुधारणा दिसून येईल (Gold rate corrected 16 percent from august high know the right time to investment).

गेल्या सहा महिन्यांत सोन्याच्या किंमतीत तब्बल 10 हजार रुपयांची घट झाली आहे. या घसरणीबाबत, आयबीजेए, इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनचे सुरेंद्र मेहता म्हणतात की, किंमती सुधारण्याची अनेक कारणे आहेत. अमेरिकन डॉलर जगातील इतर चलनांच्या तुलनेत मजबूत होत आहे. जेव्हा डॉलर मजबूत असतो, तेव्हा सोन्याचे भाव कमी होतात. या व्यतिरिक्त अमेरिकेच्या बाँड मार्केटमध्ये व्याज दरात वाढ झाली आहे, ज्यामुळे सोन्याच्या दरावरील दबाव वाढत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *