……. ही लढाई आपण नक्कीच जिंकणार; आरोग्यमंत्री राजेश टोपेंचे विद्यार्थ्यांना पत्र

Spread the love

Loading

महाराष्ट्र 24 । विशेष प्रतिनिधी । दि.२४। मुंबई । राज्यातील शाळा आणि महाविद्यालये नुकतीच सुरु झालीत आणि कोरोनानेही आपले हातपाय पसरवायला सुरूवात केली. आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनाही या कोरोनाने गाठले आहे. यादरम्यान टोपे यांनी कोरोना विरोधाची लढाई गेल्या वर्षभरापासून सुरु आहे. तुमच्या सर्वांच्या आणि महाराष्ट्रातील जनतेच्या मदतीने ही लढाई आपण नक्कीच जिंकणार यात शंका नाही असे आरोग्यमंत्री राजेश टोपेंचे विद्यार्थ्यांना पत्र लिहिताना म्हटले आहे. पत्र सोशल मीडियात सध्या व्हायरल होत आहे.

टोपे यांनी आपल्या पत्रात विद्यार्थ्यांना, तुमचं खेळण्याचं, बागडण्याचं हे वय. क्रिडागंणावर घाम गाळण्याचं हे वय. परंतु गेले वर्षभर तुम्हाला घरातच बसाव लागलं आहे. कोरोनावर मात करण्यासाठी आपण सगळेच लढत आहोत. पण आता मला तुमची मदत हवी आहे अशी साद घातली आहे.

त्याच बरोबर आपल्याला काय मदत पाहिजे हे सांगताना त्यांनी, प्रथम तुम्ही तुमचीच काळजी घ्या, त्याचबरोबर आपल्या आई-वडील, भाऊ-बहिणीची व तसेच शेजाऱ्यांची ही काळजी घ्या. आई-वडीलांना कामानिमित्त बाहेर जाव लागतं, बाहेरुन आल्यावर त्यांनी हात-पाय स्वच्छ धुतलेत का नाही ते पहा. त्यांनी बाहेर जातांना मास्क लावला आहे का नाही ते पहा. सॅनिटाझर वापरंल का नाही ते देखील पहा. शासनाने ठरवून दिलेले नियम पाळले जातात का नाही हेही पहा. जर कदाचित कोरोनाचे काही लक्षण दिसलेच तर लगेच सरकारी दवाखान्यात त्यांना घेवून जा, त्यांची काळजी असे आवाहन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *