महाराष्ट्र २४ – ऑनलाईन वृत्तसेवा – विशेष प्रतिनिधी -मुंबई – दि. २५ – अमेरिकन बॉन्ड यील्डमध्ये सतत वाढ होत असताना, आठवड्याच्या शेवटच्या दिवशी सोन्याच्या भावावर दबाव दिसून येत आहेत. सध्या, सोने 46200च्या पातळीवर ट्रेड करत आहे. सकाळी 10.30 वाजता, एप्रिल डिलीव्हरीसाठीच्या सोन्याचा भाव 19 रुपयांनी घसरून 46222 रुपये प्रति दहा ग्रॅम या पातळीवर ट्रेड करत होता. तर, त्याचप्रमाणे जून डिलिव्हरीच्या सोन्याचा भाव 24 रुपयांनी घसरून 46371 रुपयांवर ट्रेड करत होता (Gold rate today 26 February price down best opportunity for gold investment).
आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या दरावर मोठा दबाव दिसत आहे. यावेळी, एप्रिल डिलीव्हरीसाठी सोन्याचा भाव 9.65 डॉलर घसरणीसह (-0.54%) 1,765.75वर ट्रेड करत होता. चांदीबद्दल बोलायचे झाल्यास मार्च डिलिव्हरीसाठी चांदी आंतरराष्ट्रीय बाजारात -0.35 (-1.27%) च्या घसरणीसह प्रति औंस 27.28 डॉलरवर व्यापार करत आहे. एक औंस म्हणजे 28.34 ग्रॅम आहे. MCXवर मार्च डिलिव्हरीसाठी चांदीचा भाव सध्या 68722 रुपये प्रतिकिलोवर आहे, तर मे डिलिव्हरीची चांदी 602 रुपयांनी घसरण होऊन 70074 रुपयांवर ट्रेड करत आहे.
जागतिक बाजारपेठेतील विक्रीच्या व्यवसायात राष्ट्रीय राजधानीच्या सराफा बाजारात गुरुवारी सोन्याच्या किंमती 358 रुपयांनी घसरून 45,959 रुपयांवर आल्या. एचडीएफसी सिक्युरिटीजने ही माहिती दिली आहे. आधीच्या व्यापार सत्रात सोन्याचे दर 10 ग्रॅम 46,313 रुपयांवर बंद झाले होते. सोन्याचे भाव खाली आले आहेत, तर चांदी महाग झाली. चांदीचा भाव 151 रुपयांनी वाढून 69,159 रुपये झाला आहे. ज्याचा मागील बंद भाव 69,008 किलो होता (Gold rate today 26 February price down best opportunity for gold investment).
मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेडच्या कमोडिटी रिसर्चच्या नवनीत दमानी यांचे म्हणणे आहे की, आंतरराष्ट्रीय बाजारात सोने सध्या 1800 डॉलर्सने भक्कम स्थानावर आहे. मीडियम टर्ममध्ये हे 2150 डॉलरपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे. त्या म्हणाले की, आयात शुल्कामध्ये 5% कपात केल्यामुळे सोन्याच्या किंमतीतही घसरण दिसून येत आहे. परंतु, येत्या 6-12 महिन्यांत ती 56500 किंवा त्याहून अधिक वर जाऊ शकते. कमोडिटी मार्केटचे तज्ज्ञ अजूनही म्हणतात की, सोन्याच्या किंमतीत पुन्हा वाढ होईल, म्हणून ही गुंतवणुकीची सुवर्णसंधी आहे.