महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – दि. १ – पंढरपूर – आज माघ द्वितिया तृतीयानिमित्त पंढरपूर मंदिरात फुलांची सजावट करण्यात आली. पुण्यातील भाविक श्रीकांत घुंडरे आणि काळुराम थोरात या भाविकांनी ही फुलांची सजावट केली आहे. एक टन फुलांचा वापर करून ही सुंदर अशी साजवट करण्यात आली आहे. झेंडु, गुलाब, शेवंती, बीजली, जरबेरा या फुलांचा वापर करून मनमोहक अशी सजावट करण्यात आली आहे.