जियोनीचा दमदार मोबाईल ; 6000 mAh बॅटरी, डुअल कॅमेरा, 6999 किंमतीसह नवा स्मार्टफोन बाजारात

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – दि. ३ मार्च – पुणे –स्मार्टफोन निर्माती कंपनी जियोनीने (Gionee) सोमवारी त्यांचा नवा बजेट स्मार्टफोन ‘जियोनी मॅक्स प्रो’ (Gionee Max Pro) 6,999 रुपयांमध्ये भारतीय बाजारात सादर केला आहे. जेआयपीएलचे एमडी, प्रदीप जैन, जे भारतातील जियोनीचे व्यवस्थापन करतात, त्यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, कंपनी परवडणाऱ्या किंमतीत उत्पादनांची निर्मिती करण्याचा विचार करत आहे. यामध्ये जियोनीच्या एंट्री लेव्हल स्मार्टफोनचाही समावेश आहे. ते म्हणाले की, आम्हाला विश्वास आहे की आमचा जियोनी मॅक्स प्रो आजच्या पिढीच्या डिजिटल गरजा भागवेल. (Gionee Max Pro launched in India: Check out price and specs)

तथापि, जियोनीच्या फुल व्ह्यू ड्रॉप डिस्प्ले की ने सुसज्ज अशा या बजेट स्मार्टफोनमध्ये 6.52 इंचाची एचडी स्क्रीन आहे. या सुपर स्मार्ट फोनमध्ये 3 जीबी रॅम, 32 जीबी रॉम (इंटर्नल स्टोरेज स्पेस) आहे, जो 256 जीबीपर्यंत वाढवता येतो. जियोनी मॅक्स प्रो (Gionee Max Pro) मध्येदेखील दीर्घकाळ टिकणारी 6000 एमएएच बॅटरी आहे. युजर्ससाठी, यामध्ये 60 तासांचा कॉलिंग, 34 दिवसांचा स्टँडबाय, 115 तास संगीत, 12 तास गेमिंग आणि 13 तासांचा बिंग मूव्ही पाहण्याची सुविधा देण्यात आली आहे. सोबतच इतरही अनेक फीचर्स देण्यात आले आहेत.

या स्मार्टफोनमध्ये फेस अनलॉक, गुगल असिस्टंटसारखे बरेच फीचर्स देण्यात आले आहेत. हा फोन ब्लॅक, रेड आणि ब्लू या तीन रंगांमध्ये उपलब्ध आहे. यासह जियोनी मॅक्स प्रोचे ग्राहक फ्लिपकार्टवरुन 2,499 रुपयांच्या सवलतीत नवीन गुगल नेस्ट मिनी स्मार्ट स्पीकर खरेदी करू शकतात.

डुअल कॅमेरा सेटअप
या फोनमध्ये 13 एमपी प्लस 2 एमपी (मेगा पिक्सेल) डुअल रियर कॅमेरा आणि 8 एमपीचा सेल्फी कॅमेरा देखील देण्यात आला आहे. जियोनीने असा दावा केला आहे की मागील बाजूस ड्युअल-कॅमेरा सेटअप ऑटो एचडीआर, बोकेह इफेक्ट, स्लो-मोशन मोड आणि पनामा मोडला सपोर्ट करतो. रियर कॅमेर्‍याद्वारे समर्थित 30fps पर्यंत व्हिडिओ रेकॉर्डिंग केले जाऊ शकतात. या कॅमेर्‍यामध्ये पोर्ट्रेट मोड आणि एचडीआर सारखी वैशिष्ट्ये आहेत.

जियोनी मॅक्स प्रो मध्ये 2.5 डी कर्व्ड ग्लास प्रोटेक्शन देण्यात आलं आहे. हा स्मार्टफोन सध्या अँड्रॉइड 10 वर चालतो. फोनसाठी अँड्रॉइड 11 सॉफ्टवेअर लवकरच रोलाऊट केलं जाऊ शकतं, परंतु कंपनीने याविषयीची कोणतीही अथिकृत माहिती जाहीर केलेली नाही. जियोनी मॅक्स प्रो 1.6GHz ऑक्टा-कोर प्रोसेसरद्वारे समर्थित आहे. फोनमध्ये 3 जीबी रॅम आणि 32 जीबी इनबिल्ट स्टोरेज, तसेच डेडिकेटेड स्लॉटवर 256 जीबी मायक्रोएसडी सपोर्ट आहे. फोन एलटीई नेटवर्कला सपोर्ट करतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *