महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – दि. ३ मार्च – मुंबई – आरामदायी प्रवासासाठी बजाज ऑटोने मंगळवारी आपली नवी प्लॅटिना 100 इलेक्ट्रिक स्टार्ट ही दुचाकी बाजारात दाखल केली. 102 सीसीची ही बाईक 53 हजार 920 रुपये (एक्स शोरुम दिल्ली) किंमतीला ग्राहकांना खरेदी करता येईल. या गाडीमध्ये स्प्रिंग-इनöस्प्रिंग सस्पेन्शनची सोय असल्यामुळे लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी ही गाडी आरामदायक ठरते. टय़ुबलेस टायरसह ही गाडी सादर करण्यात आली आहे. प्लॅटिना वाहनाला आतापर्यंत ग्राहकांनी उत्तम प्रतिसाद दिला आहे. जवळपास 70 लाख ग्राहक त्यांनी या दरम्यान आजवर मिळवले आहेत.