16 राज्यांत आता कोरोनाचे सक्रिय रुग्ण! संख्या पोहोचली 1,68,331 वर

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – दि. ३ मार्च – मुंबई – देशात काेराेनाबद्दलच्या बेपर्वाईत वाढ झाल्याने जाेखीमही वाढलीये. मंगळवारी १६ राज्ये व केंद्रशासित प्रदेशांत सक्रिय रुग्ण वाढले. महाराष्ट्रासह पंजाब, गुजरात, छत्तीसगड, मध्य प्रदेशसारख्या राज्यांतील नवे रुग्ण वाढत चालले आहेत. नवे रुग्ण असलेल्या राज्यांची यादी आता लांबत चालली आहे. मंगळवारी एकूण नवीन रुग्ण संख्या कमी हाेऊन १२,२७६ अशी झाली एवढा मात्र दिलासा राहिला. एक आठवड्यानंतर नवे रुग्ण १५ हजारांहून कमी झाले. जवळपास निम्मे रुग्ण अजूनही महाराष्ट्रात आहेत. मंगळवारी गेल्या चाेवीस तासांत ९१ जणांचा मृत्यू झाला. ही संख्याही आदल्या दिवशीच्या तुलनेत कमी झाली. एकूण ८६ टक्के मृत्यू केवळ ६ राज्यांत झाले आहेत. मंगळवारी देशात सक्रिय रुग्णांची संख्या १,६८, ३३१ झाली होती.

देशात वाढत्या रुग्णसंख्येबाबत आराेग्य सचिव राजेश भूषण म्हणाले, केंद्राची संपूर्ण घडामाेडींवर निगराणी आहे. तामिळनाडू व पंजाबमध्ये केंद्राने पथके तैनात केली आहेत. हरियाणात निगराणी केली जात आहे. देशातील २२ राज्यांतील १४० जिल्ह्यांत काेराेनाचा आलेख वर आहे. १० दिवसांपूर्वी म्हणजे २२ जानेवारीपर्यंत अशा प्रकारचे १२२ जिल्हे हाेते. त्यापैकी महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्यांचा समावेश आहे. त्याशिवाय केरळ-९, तामिळनाडू-७, पंजाब व गुजरातच्या प्रत्येकी ६ जिल्ह्यांचा यात समावेश आहे. या जिल्ह्यांत दाेन महिन्यांच्या तुलनेत काेराेनाची रुग्णसंख्या दरराेज वाढत चालली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *