केंद्र सरकारचा मोठा निर्णय ; आता दिवसाचे २४ तास चालणार कोरोना लसीकरण,

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – दि. ३ मार्च – नवीदिल्ली – एकीकडे देशातील काही भागांत कोरोनाच्या रुग्णांची संख्या पुन्हा एकदा वाढू लागली असतानाच दुसरीकडे सरकारने सर्वसामान्यांचे कोरोना लसीकरण करण्यास सुरुवात केली आहे. १ मार्चपासून देशभरातील ६० वर्षांवरील नागरिक आणि ४५ वर्षांवरील सहव्याधी असलेल्या व्यक्तींना लस देण्यास सुरुवात करण्यात आली आहे. दरम्यान, देशातील कोरोना लसीकरणाचा वेग वाढवण्यासाठी केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी मोठा निर्णय जाहीर केला आहे. देशभरातील नागरिक आथा दिवसाच्या २४ तासांत कधीही आपल्या सोईनुसार कोरोनावरील लस घेऊ शकणार आहेत. ( Corona vaccination will now run 24 hours a day, a big decision of the Union Health Minister Dr. Harsh Vardhan)

केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यासंदर्भात केलेल्या ट्विटमध्ये म्हणाले की, केंद्र सरकारने कोरोना लसीकरणाचा वेग वाढवण्यासाठी लसीकरणासाठी असलेली वेळमर्यादा समाप्त करण्याचा निर्णय घेतला आहे. देशातील नागरिक आता दिवसाच्या २४ तासांत कधीही लस घेऊ शकतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी देशातील नागरिकांच्या आरोग्यासोबतच त्यांच्या वेळेचे महत्त्वही जाणतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *