महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – दि. ३ मार्च – नवीदिल्ली –जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुक अब्दुल्ला (Farooq Abdullah) यांच्या विरोधातील याचिकेवर निर्णय देताना सुप्रीम कोर्टानं (Supreme Court) एक मोठा निर्णय दिला आहे. ‘कोणत्याही प्रकारच्या धोरणाला विरोध करणं किंवा त्याला आक्षेप घेणं हा देशद्रोह असू शकत नाही,’ असं सुप्रीम कोर्टानं सुनावलं आहे. रजत शर्मा नावाच्या एका व्यक्तीनं ही याचिका दाखल केली होती. या प्रकरणात कोर्टाचा वेळ घेतला म्हणून शर्मा यांना 50 हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.
‘पूर्व लडाख (Eastern Ladakh) परिसरात भारत आणि चीन यांच्यात सुरू असलेला संघर्ष (India -China conflict) हा जम्मू काश्मीरला विशेष दर्जा देणारे 370 कलम रद्द करण्यात आल्याचा परिणाम आहे. चीन सरकारनं याचा सुरुवातीपासून विरोध केला आहे. सीमेवरील चीनचं आक्रमक धोरण हा मोदी सरकारच्या चुकीचा परिणाम आहे,’ अशी टीका अब्दुल्ला यांनी केली होती.
फारुख अब्दुल्ला यांच्या या टीकेवर आक्षेप घेत शर्मा यांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. अब्दुल्ला यांना चीन आणि पाकिस्तानमधून पैसे मिळतात असा दावा याचिकेत करण्यात आला होता. मात्र हा दावा सिद्ध करण्यात त्यांना कोर्टात अपयश आलं. त्यावेळी कोर्टानं ही याचिका फेटाळत शर्मा यांच्यावर दंडात्मक कारवाई केली आहे.
A bench of the Supreme Court, headed by Justice Sanjay Kishan Kaul, while refusing to entertain a PIL against former J&K CM Farooq Abdullah, observed that the expression of views that are different from the opinion of the government cannot be termed as seditious pic.twitter.com/sn2Ptxf5mb
— ANI (@ANI) March 3, 2021
फारुक अब्दुल्ला हे नॅशनल कॉन्फरन्सचे ज्येष्ठ नेते आहेत. या पक्षाच्या प्रवक्त्यानं त्यांच्या विधानावर स्पष्टीकरण दिलं आहे. ‘आमचे अध्यक्ष मागच्या वर्षी 5 ऑगस्ट रोजी संसदेकडून रद्द करण्यात आलेले कलम 370 आणि कलम 35 A याबाबत लोकांच्या मनातील असंतोष मांडत होते. हे काम ते गेल्या अनेक महिन्यापासून करत आहेत. जम्मू काश्मीरमध्ये कोणत्याही प्रकारचा बदल पक्षाला मान्य नाही,’ असं त्यांनी यावेळी निक्षून सांगितलं आहे.