महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – दि. ३ मार्च – वेलिंग्टन –इंडियन प्रीमियर लीग 2021 (IPL 2021) पूर्वी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या (RCB) फॅन्ससाठी आनंदाची बातमी आहे. बंगळुरुनं यावर्षी मोठ्या किंमतीमध्ये खरेदी केलेल्या ग्लेन मॅक्सवेलनं (Glenn Maxwell) त्याच्या लौकिकाला साजेशी खेळी केली आहे. न्यूझीलंड विरुद्धच्या तिसऱ्या T20 मध्ये मॅक्सवेलनं फक्त 31 बॉलमध्ये 70 रनची खेळी केली.
मॅक्सवेलसाठी मागील आयपीएल सिझन निराशाजनक गेला होता. त्यानंतरही त्याला यंदाच्या लिलावात आरसीबीनं 14 कोटी 25 लाख रुपयांना खरेदी केलं होतं. न्यूझीलंड विरुद्ध सध्या सुरू असलेल्या मालिकेत मॅक्सवेलला यापूर्वी छाप पाडता आली नव्हती. पहिल्या दोन मॅचमध्ये अपयशी ठरलेल्या मॅक्सवेलनं तिसऱ्या मॅचमध्ये ती कसर भरुन काढली.
न्यूझीलंडचा फास्ट बॉलर जेम्स निशमला (James Neesham) मॅक्सवेलचा सर्वात मोठा तडाखा बसला. मागील आयपीएल सिझनमध्ये हे दोघंही किंग्ज इलेव्हन पंजाब कडून खेळत होते. आपल्या जुन्या सहकाऱ्याच्या एकाच ओव्हरमध्ये मॅक्सवेलनं 4 फोर आणि 2 सिक्सच्या मदतीनं 28 रन काढले.
The last off Maxwell's five big sixes! #NZvAUS pic.twitter.com/jIgeVr4t91
— cricket.com.au (@cricketcomau) March 3, 2021
मॅक्सवेलनं त्याच्या या इनिंगमध्ये एकूण 8 फोर आणि 5 सिक्स लगावले.
मॅक्सवेलचे 70 आणि ऑस्ट्रेलियाचा कॅप्टन आरोन फिंच (Aaron Finch) याच्या 69 रनच्या जोरावर ऑस्ट्रेलियानं पहिल्यांदा बॅटींग करताना 4 आऊट 208 रन केले. न्यूझीलंडला हे आव्हान पेलवलं नाही. त्यांची संपूर्ण टीम 17. 1 ओव्हरमध्ये 144 रनवर ऑल आऊट झाली.
न्यूझीलंडकडून मार्टान गप्टीलनं सर्वात जास्त 43 रन्स काढले. ऑस्ट्रेलियाकडून एस्टन अगरनं सर्वात भेदक मारा केला. त्यानं 4 ओव्हरमध्ये 30 रन देऊन 6 विकेट्स घेतल्या. अगरच्या या भेदक माऱ्यामुळेच ऑस्ट्रेलियानं तिसरी टी-20 64 रननं जिंकली.
(वाचा : ‘मी अश्विन आणि अक्षरचं कौतुक का करू? इंझमामचा सवाल )
पाच टी-20 च्या या मालिकेत न्यूझीलंड 2-0 नं आघाडीवर आहे. त्यामुळे आता ही मालिका जिंकण्यासाठी ऑस्ट्रेलियाला उर्वरित सर्व मॅच जिंकणं आवश्यक आहे.