भन्नाट डान्स ; ‘नाच रे मोरा’वर डान्स करणाऱ्या तरुणाचा सोशल मीडियावर ‘धुरळा’

Spread the love

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – दि.८ मार्च – पुणे – वरातील नाचणाऱ्यांचे अजब प्रकार सर्वांच्याच परिचयाचे असतील. एका तरुणानं मात्र याच वरातीत नाच रे मोरा गाण्यावर डान्स करून धुरळा उडवून दिला आहे. सोशल मीडियावर त्याचीच चर्चा होत आहे. काही दिवसांपूर्वी नाच रे मोरा आणि चला ओ ना नैनोसे बाण रे गाण्यानं सोशल मीडियावर धुमाकूळ घातला होता. त्यानंतर आता एका रिक्षावाल्याचा डान्स सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

या तरुणानं नवरदेवासमोर नाच रे मोरावर ज्या स्टाइलनं डान्स केलाय त्याची चर्चाच सर्वत्र होत आहे. आजपर्यंत ते गाणं बडबड गीत आणि लहान मुलांसाठी आहे ही परिभाषाच या तरुणाच्या डान्सनं बदलून जावी इतका भन्नाट हा डान्स व्हायरल होत आहे.

या तरुणाचं नाव अभी धाले असल्याची माहिती मिळाली आहे. पुण्याच्या धनकवडी इथे हा तरुण राहातो. या तरुणाचा नाच रे मोरा व्हिडीओनंतर लगाओ ना नैनोंसे बाण रे या गाण्यावरही हा तरुण तुफान डान्स करताना दिसत आहे. आपल्यासोबत नवरदेवालाही या गाण्यावर ठेका धरायला लावला आहे. दोघांचा डान्स पाहून वऱ्हाडीही जोमात आले. उपस्थित वऱ्हाडींपैकी काहींनी याचा व्हिडीओ करून सोशल मीडियावर तुफान व्हायरल केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *