उत्तर कोरियातील तुरुंग सर्वात धोकादायक

Spread the love

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – दि.८ मार्च –उत्तर कोरिया – चीनच्या शिनजियांग प्रांतातील स्थानबद्धता शिबिरांमधील उइगूर मुस्लिमांवरील अत्याचाराला वाचा फुटली आहे. पण उत्तर कोरिया जगाच्या नजरेपासून वाचला आहे. वास्तवात उत्तर कोरियातील तुरुंग अधिक धोकादायक आहेत. उत्तर कोरियातील सर्वात धोकादायक तुरुंगांपैकी योडोक कॉन्स्ट्रेशन कँप आहे. तेथे 10 वर्षे खितपत पडल्यावर कशाप्रकारे बाहेर पडलेले कांग चोल ह्वान यांनी यासंबंधी माहिती दिली आहे.

तुरुंगातील कैद्यांना दिवसातील 18 तास सक्तमजुरी करणे भाग होते, यात जंगलातून लाकडांचे मोळे आणणेही सामील होते. उत्तर कोरियाच्या तुरुंगात बलात्कार, गर्भपात, हत्या आणि सक्तमजुरी यासारख्या गोष्टी नित्याच्याच आहेत. देशातील तुरुंगांमध्ये सध्या 2 लाखांपेक्षाही अधिक कैदी आहेत. या तुरुंगांच्या चहुबाजूला रायफल, हँडग्रेनेड आणि क्रूर श्वानांची एक फौज असते.

यातील अनेक तुरुंगांमध्ये केवळ विदेशी नागरिकांना ठेवण्यात आले. अशाच एका तुरुंगात होईरयोंग कॉन्स्ट्रेशन कँप किंवा कँप 22 म्हटले जाते. विदेशी प्रसारमाध्यमांच्या टीकेच्या भडिमारानंतर हा तुरुंग बंद करण्यात आला आहे. तेथे कैद्यांना नरकयातना भोगाव्या लागायच्या. आजारी पडलेल्या कैद्याला उपचाराऐवजी जिवंत गाडले जायचे. तुरुंगातून पलायनाचा प्रयत्न केल्यास कैद्याला जिवंत जाळण्यात यायचे.

विदेशींना अन्नाच्या नावावर 180 ग्रॅम कॉर्न दिले जायचे. एखाद्या कैद्याने भूक लागल्याचे सांगितल्यास त्याला जिवंत उंदिर किंवा साप खाण्यास दिला जात होता. दर महिन्याला शेकडो कैदी मरायचे आणि कितीतरी बेपत्ता व्हायचे. एका कोठडीत सुमारे 100 कैद्यांना ठेवण्यात येते.

उत्तर कोरियातील महिला कैद्यांची स्थिती सर्वात खराब आहे. तुरुंगात संक्रमित इंजेक्शनमुळे बहुतांश महिलांना गुप्तरोगाची लागण होते. तर तुरुंगात महिलांवर बलात्कार आणि बळजबरीचा गर्भपात तेथे सामान्य बाब आहे. तसेच एखाद्या कैद्याला मृत्युदंड ठोठावला गेल्यास त्याला स्वतःची कब्र स्वतःच खोदावी लागते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *