महाराष्ट्र 24 । विशेष प्रतिनिधी । दि.९ मार्च । मुंबई । अर्थमंत्री अजित पवार यांनी महाविकास आघाडी सरकारचा दुसरा अर्थसंकल्प आज (8 मार्च ) मांडला. या अर्थसंकल्पात सरकारनं आरोग्य सुविधांवर विशेष भर दिलेला दिसून आला आहे. तसंच महिला दिनाचं औचित्य साधत महिलांसाठी वेगवेगळ्या घोषणा करण्यात आल्या आहेत.
यंदा राज्याच्या अर्थसंकल्पात 10,226 कोटी महसूली तूट अपेक्षित आहे.
अर्थसंकल्पातील 7 महत्त्वाच्या घोषणा
# राजमाता जिजाऊ गृहस्वामिनी योजना – घर विकत घेताना ते घरातील महिलेच्या नावा घेतलं तर मुद्रांक शुल्कात 1 टक्के सवलत मिळणार.
# राज्यातील सर्व विद्यार्थिनींना मोफत एस.टी प्रवास, त्यासाठी 1500 CNG आणि हायब्रिड बस राज्य सरकार एसटीला देणार, तसंच तेजस्विनी
योजनेअंतर्गत महिलांसाठी विशेष बस उपलब्ध करून देणार.
# तीन लाखापर्यंत कर्ज घेऊन नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना शून्य टक्के व्याजदराने कर्ज देणार
# समृद्धी महामार्गाचं 44 % पूर्ण झाले. नागपूर ते शिर्डी रस्ता 1 मेपासून खुला होणार
# सिंधुदुर्ग, उस्मानाबाद, रायगड, अमरावती, परभणी आणि साताऱ्यात मेडिकल कॉलेज उभारणार
# लोकांना विज्ञानाचं महत्त्व पटवून देण्यासाठी राजीव गांधी विज्ञान पार्क प्रत्येक जिल्ह्यात उभारणार
# देशी ब्रँडेड मद्यावरचं शुल्क वाढवलं त्यामुळे देशी दारू आता महाग होणार आहे.