आता FASTag नसेल तर , वाहनाचा इन्शोरन्सही होणार नाही; या तारखेपासून लागू होणार हा नियम

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – दि.९ मार्च – रस्ते वाहतूक मंत्रालयाने (Ministry of Road Transport) चारचाकी वाहनांसाठी 15 फेब्रुवारीपासून फास्टॅग (FASTag) अनिवार्य केला आहे. त्याशिवाय नव्या व्यवस्थेअंतर्गत विना फास्टॅग वाहनांचा इन्शोरन्सही (insurance) होणार नसल्याची माहिती समोर आली आहे. ही व्यवस्था 1 एप्रिलपासून लागू होणार आहे. रस्ते वाहतूक मंत्रालयाने फास्टॅग अनिवार्य करत, तो इन्शोरन्सशी जोडण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी इन्शोरन्स कंपन्यांना आवश्यक ते आदेश देण्यात आले आहेत.

रस्ते वाहतूक मंत्रालयनुसार, 1 एप्रिल 2021 पासून फोर व्हिलरचा इन्शोरन्स करण्यासाठी वाहनावर फास्टॅग बसवणं आवश्यक आहे. इन्शोरन्स काढताना, इन्शोरन्स कंपन्या वाहन क्रमांकाच्या आधारे फास्टॅगचा लेसर कोड तपासतील, ज्याद्वारे फास्टॅग लावला आहे की नाही याबाबत माहिती मिळेल. कंपन्यांना वाहतूक सॉफ्टवेअरच्या मदतीने फास्टॅगची माहिती मिळेल.रस्ते वाहतूक मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या नव्या व्यवस्थेमुळे 31 मार्च 2021 नंतर एक्सपायर झालेला, संपलेला इन्शोरन्स पुन्हा फास्टॅगसह येईल. अशाप्रकारे हळू-हळू इन्शोरन्स काढल्या गेलेल्या सर्व जुन्या वाहनांवरही फास्टॅग लागेल.

मंत्रालयाने, इतर अनेक सुविधाही फास्टॅगशी जोडण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. सर्वात आधी पार्किंग चार्ज फास्टॅगद्वारे घेण्याची योजना आहे. हैदराबाद एयरपोर्टवर ही सुविधा सुरू करण्यात आली आहे. तेथे पार्किंग चार्ज फास्टॅगमधून घेतला जात आहे. हळू-हळू ही सुविधा सर्व महानगरांमध्ये सुरू करण्याची तयारी आहे.रस्ते वाहतूक मंत्रालय अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, भविष्यात पेट्रोल पंपावरही पेमेंट फास्टॅगनेच केलं जाऊ शकेल. सध्या जवळपास 2.5 कोटीहून अधिक वाहनांवर फास्टॅग लावण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *