महाराष्ट्र 24 । विशेष प्रतिनिधी । दि.९ मार्च । कोलकत्ता । भारतीय संघाने इंग्लंडला नमवत आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये प्रवेश केला. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील अंतिम सामना इंग्लंडमधील लॉर्ड्सच्या मैदानात रंगणार होता. 18 जून 2021 ला क्रिकेटच्या पंढरीत होणारा सामना स्थलांतरित करण्यात येणार आहे. भारतीय संघाचे माजी कर्णधार आणि बीसीसीआयचे विद्यमान अध्यक्ष सौरव गांगुली यांनी यासंदर्भात माहिती दिलीय. सौरव गांगुलींनी दिलेल्या माहितीनुसार, आयसीसी टेस्ट वर्ल्ड चॅम्पियनशिपचा महामुकाबला लॉर्ड्स ऐवजी न्यूझीलंडच्या घरच्या मैदानात रंगणार आहे. साउथहॅम्टनच्या मैदानात हा सामना खेळवण्यात येईल, असे गांगुली यांनी म्हटले आहे.
सौरव गांगुली यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये यासंदर्भात माहिती दिली आहे. यासंदर्भात अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नसली तरी हा निर्णय खूप अगोदर घेण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर फायनलचे ठिकाण बदलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. साउथहॅम्टनच्या स्टेडियमजवळच हॉटेल्स आहेत, त्यामुळे या मैदानाला पसंती देण्यात आली आहे.
कोरोनाच्या संकटानंतर साउथहॅम्टनमध्ये अनेक सामने खेळवण्यात आले. त्यामुळे फायनच्या लढत या ठिकाणीच घेण्याच निर्णय झाला आहे. आयसीसीने यावर अधिकृत शिक्कामोर्तब करायचे बाकी आहे, असे सौरव गांगुली यांनी सांगितले. आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपला 1 ऑगस्ट 2019 पासून सुरुवात झाली होती. कसोटी खेळणाऱ्या राष्ट्रांतून अव्वल दोन संघ 18 ते 22 जून या कालावधीत अंतिम सामना खेळणार आहेत. पहिल्या आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅंम्पियनशिपसाठी न्यूझीलंडच्या संघाने सर्वात आधी पात्रता सिद्ध केली.
त्यापाठोपाठ भारतीय संघाने फायनलचे तिकीट मिळवले आहे. ज्या दोन वर्षांतील कसोटी मालिकांच्या जोरावर भारतीय संघाने फायनल गाठली त्याच भारतीय संघाने एकच कसोटी मालिका गमावली आहे. ती मालिका भारतीय संघाला न्यूझीलंडच्या घरच्या मैदानात 2-0 असा पराभव स्वीकारावा लागला होता. जर फायनलची लढत लॉर्ड्स ऐवजी न्यूझीलंडमधील साउथहॅम्टनमध्ये झाली तर भारतीय संघाला मानसिक दबाव असेल. स्वप्न तुटणार नाही यासाठी टीम इंडियाला परदेशात दमदार खेळ करुन दाखवावा लागेल.