पोस्ट ऑफिस बचत खातेधारकांसाठी चांगली बातमी

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – दि.९ मार्च – Post officeमधील बचत खात्यात पैसे काढण्याचे नियम बदलण्यात आले. त्यामुळे आता तुम्हाला जास्तीचे पैसे काढता येणार आहेत. भारतीय पोस्टने पोस्ट ऑफिसमधील खातेदारांसाठी अनेक नियम बदलून दिलासा दिला आहे. इंडियन पोस्टने पोस्ट ऑफिस बचत योजनांमध्ये (Post Office Saving Schemes) पैसे काढण्याची मर्यादा वाढविली आहे. यामुळे पोस्ट ऑफिस बचत योजना बँकांशी स्पर्धा करू शकतील आणि टपाल कार्यालयातील ठेवी दीर्घ कालावधीत वाढेल, असे पोस्टाला वाटत आहे.

या नव्या नियमामुळे ग्रामीण टपाल विभागातील खातेदार एका दिवसात 20,000 रुपये काढू शकतात. पूर्वी ही मर्यादा 5,000 रुपये होती. याशिवाय कोणत्याही शाखेचे पोस्टमास्टर (BPM) एका खात्यात एका दिवसात 50,000 पेक्षा जास्त रोख ठेव व्यवहार स्वीकारणार नाही. म्हणजे एका दिवसात एका खात्यात 50,000 रुपयांपेक्षा जास्त रोख व्यवहार करता येणार नाहीत.

नवीन नियमांनुसार बचत खात्याशिवाय आता सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF), ज्येष्ठ नागरिक बचत योजना (NSC), मासिक उत्पन्न योजना (SCSS), किसान विकास पत्र (KVP), राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र (एनएससी) या योजनांमध्ये पैसे काढणे किंवा जमा चेकच्या माध्यमातून स्विकारण्यात येणार आहेत. तसेच काढता येणार आहेत.

पोस्ट ऑफिस सेव्हिंग यात्यावर तुम्हाला 4 टक्के वार्षिक व्याज मिळते, पोस्ट ऑफिसमध्ये उघडलेल्या बचत खात्यासाठी किमान 500 रुपये शिल्लक ठेवणे आवश्यक आहे. आपल्या खात्यात 500 रुपयांपेक्षा कमी पैसे असल्यास 100 रुपये खाते देखभाल फी म्हणून कापली जाणार आहे.

पोस्ट ऑफिस योजना
पोस्ट ऑफिस बचत खाते
– 5 वर्ष पोस्ट ऑफिस आवर्ती ठेव खाते
– पोस्ट ऑफिस मुदत ठेव खाते
– पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजना खाते
– ज्येष्ठ नागरिक बचत योजना
– 15 वर्ष सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी खाते
– सुकन्या समृद्धी खाते
– राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र
– किसान विकास पत्र

पोस्ट ऑफिस बचत योजनांवरील व्याज
योजनेचे व्याज (टक्के / वार्षिक)
पोस्ट ऑफिस बचत खाते
1 वर्षाचे टीडी खाते 5.5
2-वर्षाचा टीडी खाते 5.5
5 वर्ष टीडी खाते 6.7
5-वर्षाची आरडी 5.8
ज्येष्ठ नागरिक बचत योजना 7.4
पीपीएफ 7.1
किसान विकास पत्र 6.9
सुकन्या समृद्धि खाते 7.6

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *