शिखर धवनला मिळणार डच्चू; ही असेल भारताची सलामीची जोडी

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – दि. १० मार्च – मुंबई -: इंग्लंडला चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत पराभूत केल्यानंतर आता भारतीय संघाची तयारी टी-२० सामन्यासाठी सुरू आहे. टी-२०च्या आधी भारतीय संघासमोरची सर्वात मोठी डोकेदुखी म्हणजे अंतिम ११ खेळाडूंची निवड करणे होय. कारण प्रत्येक स्थानासाठी संघात दोन-दोन खेळाडू आहेत. अशा परिस्थितीत चांगल्या खेळाडूंना देखील संघाबाहेर राहण्याची वेळ येऊ शकते.सलामीच्या जोडीवर नजर टाकली तर भारतीय संघात असे तीन खेळाडू आहेत ज्यांना रिप्लेस करणे शक्य नाही आणि त्यांना संघाबाहेर ठेवण्याचा निर्णय देखील योग्य नसले. भारतीय संघ व्यवस्थापन संघ निवडीचा निर्णय कसा घेतो यावर बऱ्याच गोष्टी ठरणार आहेत. अशात सलामीवीर शिखर धवनला संघाबाहेर ठेवण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो.

शिखरला संघात तेव्हाच संधी मिळेल जेव्हा केएल राहुल किंवा रोहित शर्मा यापैकी कोणाला तरी दुखापत होईल किंवा त्यांना विश्रांती दिली जाईल.गेल्यावर्षी झालेल्या आयपीएलमध्ये राहुलने सर्वाधिक धावा केल्या होत्या. तर शिखर धवन दुसऱ्या स्थानावर होता. पण रोहितचा टी-२० संघात समावेश झाल्याने शिखरला जागा मिळण्याचे अवघड झाले आहे. भारतीय संघाची पहिली पसंद रोहित आणि राहुल हिच असेल. डाव्या आणि उजव्या हाताचा फलंदाज अशी ओपनीग जोडीचा विचार केला गेला तर राहुल संघाबाहेर होऊ शकतो. पण त्याचा फॉर्म पाहता विराट कोहली असे करणार नाही.

इंग्लंडविरुद्ध शुक्रवारी होणाऱ्या पहिल्या टी-२० सामन्यात राहुल चाहरची निवड केली जाऊ शकते. राहुल तेवतिया आणि वरुण चक्रवर्ती यांच्या फिटनेस संदर्भात अद्याप अपडेट आले नाहीत. त्यामुळे चाहरला संधी मिळू शकते. तो सध्या भारती संघासोबत आहे आणि सराव सत्रात दिसतोय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *