महाशिवरात्री ; कुंभमेळ्यातील पहिल्या शाही स्नानाला सुरुवात

Spread the love

Loading

महाराष्ट्र 24 । विशेष प्रतिनिधी । दि.११ मार्च । हरिद्वार। देवभूमी उत्तराखंडातील हरिद्वारमध्ये कुंभमेळा २०२१ च्या पहिलं शाही स्नान आज महाशिवरात्रीच्या दिवशी पार पडतंय. या निमित्तानं इथे होणाऱ्या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी सुरक्षा व्यवस्थाही तैनात आहे.साधुंचे आखाडे स्नान करण्यासाठी जातात, त्याला शाही स्नान म्हणतात. आखाड्यांतील साधू सकाळी ९.०० वाजता आपल्या शिबिरांतून निघून ‘हर की पौंडी’वर ब्रह्मकुंडात होईल. जवळपास ११.०० वाजेपर्यंत हे शाही स्नान सुरू राहील. आज जुना आखाडा, आव्हान आखाडा, अग्नि आखाडा आणि किन्नर आखाडा जवळपास ११.०० वाजता हर की पौडी ब्रह्मकुंडावर स्नानासाठी उतररणार आहेत. त्यानंतर निरंजनी आखाडा आणि आनंद आखाडा १.०० वाजता स्नानाचा लाभ घेतील. त्यानंतर महानिर्वाणी आखाडा आणि अटल आखाडा ४.०० वाजता स्नानासाठी पोहचतील.

उल्लेखनीय म्हणजे, गुरुवारी महाशिवरात्रीच्या निमित्तानं सामान्य जनतेला मात्र ‘हर की पौंडी’वर स्नान करता येणार नाही.

कुंभमेळा प्रशासनानं सकाळी ८.०० वाजपल्यापासून रात्री ८.०० वाजेपर्यंत सामान्यांना ‘हर की पौडी’वर स्नानाला बंदी घातलीय. इतर घाटांवर मात्र सामान्य लोक स्नान करू शकतील. इतर घाटही जवळपास ९ किलोमीटर लांब आहेत इथे स्नान केलं जाऊ शकतं. सकाळी ८.०० च्या अगोदरही अनेक भाविक इथं स्नानासाठी दाखल झाले होते.

महाशिवरात्री निमित्ताननं राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी नागरिकांना शुभेच्छा दिल्या आहेत.

हरिद्वारमध्ये शाहीस्नाना अगोदर जवळपास २२ लाखांहून अधिक श्रद्धाळूंनी स्नान उरकलंय. त्यानंतर घाट आखाड्यांसाठी रिकामे करण्यात आले, अशी माहिती पोलीस महानिरीक्षक संजय गुंजयाल यांनी दिलीय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *