महाराष्ट्र 24 । विशेष प्रतिनिधी । दि.१५ मार्च ।मुंबई । केंद्र सरकारने सार्वजनिक क्षेत्रातील बँकाच्या खासगीकरणास सुरुवात केली असून याविरोधात बँक कर्मचाऱयांनी आक्रमक पवित्रा धारण केला आहे. याविरोधात देशभरातील नऊ कर्मचारी संघटनांनी सोमवार आणि मंगळवारी दोनदिवसीय देशव्यापी संपाची हाक दिली आहे. युनायटेड फोरम ऑफ बँक या संघटनेच्या माध्यमातून ही संपाची हाक देण्यात आली आहे.