महाराष्ट्र 24 । विशेष प्रतिनिधी । दि.१६ मार्च । मुंबई । राज्यात पुढील तीन दिवस पावसाची (Rain) शक्यता आहे. गुरुवारपासून तीन दिवस पावसाचा (Rain) अंदाज वर्तविण्यात आला आहे. मध्य महाराष्ट्र (Central Maharashtra), विदर्भ ( Vidarbha), मराठवाड्यात ( Marathwada) पावसाची शक्यता आहे. तर कोकणातही (Konkan) पाऊस होण्याचा अंदाज आहे.
दरम्यान, पश्चिमी चक्रीवादळामुळे राज्यांत पावसाची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे. सध्या सर्वत्र दिवसाचे कमाल तापमान सरासरीपुढेच आहे. मात्र, पुढील दोन दिवसांत तापमानात घट होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. राज्यात वीजांच्या कडकडाटासह पाऊस पडेल. त्याचवेळी गारपीटीचीही शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. त्यामुळे शेतकरी वर्गाला काळजी घेण्याची गरज निर्माण झाली आहे.
मध्यम-स्तरीय पश्चिमेकडील वारे आणि खालच्या स्तराच्या पूर्वेकडील वाऱ्याच्या आंतर क्रियेच्या प्रभावाखाली, 18 ते 20 मार्च 2021 दरम्यान मध्य महाराष्ट्र, मराठवाडामध्ये मेघ गरजेनेसह पाऊस पड्ण्याची शक्यता आहे. तर विदर्भात मेघ गरजेनेसह गारपीट होण्याची शक्यता आहे.