नवीन नंबरवर जुने व्हॉट्सअ‍ॅप चॅट होणार उपलब्ध

Spread the love

Loading

महाराष्ट्र 24 । विशेष प्रतिनिधी । दि.१६ मार्च । मुंबई । स्मार्टफोन युजर्सकडून (Smartphone Users) इन्स्टंट मेसेजिंग प्लॅटफॉर्ममध्ये व्हॉट्सअ‍ॅप (Whatsapp) हे सर्वांत जास्त प्रमाणात वापरलं जाणारं अ‍ॅप आहे. बरेच लोक संदेश पाठविण्यासाठी आणि व्हॉईस आणि व्हिडिओ कॉल करण्यासाठी याचा वापर करतात. व्हॉट्सअ‍ॅप हा आता आपल्या मोबाइलमधील अविभाज्य घटक झाला आहे. काही कारणानं आपल्याला आपला मोबाइल नंबर बदलण्याची वेळ आली तर सगळ्यात मोठा प्रश्न पडतो तो तो आपल्या व्हॉट्सअ‍ॅप चॅटचं (whatsapp Chat) काय ? दुसऱ्या नंबरवर आधीच्या नंबरवरील व्हॉट्सअ‍ॅप चॅट कसं मिळणार? हा सगळा डेटा जाणार की काय याची भीती वाटत असते; पण आता काळजीचं काही कारण नाही. कारण व्हॉट्सअ‍ॅपनं आपला फोन नंबर बदलला तरी आपल्या जुन्या नंबरवरील सर्व व्हॉट्सअ‍ॅप चॅट नव्या नंबरवर उपलब्ध करून देण्याची सुविधा दिली आहे.

एनडीटीव्ही डॉट कॉमनं ही माहिती दिली आहे. व्हॉट्सअ‍ॅपच्या या चेंज नंबर फिचरमुळे तुमचा व्हॉट्सअ‍ॅपचा नंबर बदलला आहे, हा संदेशदेखील तुमच्या कॉन्टॅक्टमधील लोकांना आपोआप पाठवला जाईल.

यासाठी एक छोटीशी प्रक्रिया युजर्सना करावी लागेल. प्रथम तुमचा मोबाईल नंबर बदलण्याची प्रक्रिया सुरू करण्यापूर्वी, आपल्या फोनमध्ये नवीन फोननंबरचे सिम कार्ड घाला. त्यावर एसएमएस किंवा फोन कॉल मिळत असल्याची खात्री करा. जुना फोननंबरदेखील व्हॉट्सअ‍ॅपवर अद्याप रजिस्टर आहे, याची खात्री करून घ्या. व्हॉट्सअ‍ॅप सेटिंग्ज मेनूमध्ये आपले प्रोफाइल टॅप करून फोन नंबर तपासू शकता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *