शेणापासून पेंट बनवण्याचा व्यवसाय सुरु करा, ट्रेनिंग अवघ्या 5000 रुपयांत

Spread the love

Loading

महाराष्ट्र 24 । विशेष प्रतिनिधी । दि.१६ मार्च ।नवीदिल्ली । आपण जर गाईच्या शेणापासून पेंट बनवण्याचा व्यवसाय सुरु करण्याच्या विचारात असाल तर बिनधास्त पुढे पाऊल टाका. या व्यवसायात यशस्वी बनण्यासाठी नेमके काय केले पाहिजे, कोणत्या गोष्टी टाळल्या पाहिजेत, याचे प्रशिक्षण अवघ्या 5000 रुपयांत मिळणार आहे. केवळ सात दिवस व्यवसायाचे धडे घ्यावे लागणार आहेत. या व्यवसायात चांगली कमाई होऊ शकणार आहे. केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी टाकाऊपासून काही उपयुक्त बनवण्याच्या उपक्रमात पुढाकार घेतला आहे. गाईच्या शेणापासून पेंट बनवणे हा व्यवसायदेखील त्यांच्याच उपक्रमाचा भाग आहे. (Start a business of making paint from dung, training for just Rs.5000)

शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविणे हा हेतू
शेतकऱ्यांचे उपन्न वाढवणे हा उद्देश समोर ठेवून केंद्रीय मंत्री गडकरी यांनी ही कल्पना अमलात आणण्यासाठी पुढाकार घेतला आहे. गडकरी यांनी या योजनेबद्दल प्रसारमाध्यमांशी बोलताना विस्ताराने माहिती दिली. शेणापासून पेंट बनवण्याच्या कारखान्याबद्दलही त्यांनी सांगितले. ते म्हणाले, बाजारात डिस्टेंपर आणि इनेमल पेंट उपलब्ध आहे. दोन्ही पेंट खादी ग्रामोद्योगच्या जयपुर येथील कुमारप्पा इंस्टीट्यूटच्या लोकांनी मिळून बनवले आहे. भारतात एकूण पशुधनची संख्या 535.78 दशलक्ष आहे.

ब्रँडेड पेंटच्या जागी नैसर्गिक पेंटचा वापर
शेणापासून बनवलेले पेंट ब्रँडेड इनेमल पेंट आणि डिस्टेंपर पेंटचे आंतरराष्ट्रीय पातळीवर आखून देण्यात आलेल्या नियमावलीचे पूर्तता करते. गडकरी यांनी त्यांचे कार्यालय आणि घर दोन्ही ठिकाणी शेणापासून बनवलेल्या पेन्टपासून रंगकाम केले आहे. हे रंगकाम पाहून कुणाचाही विश्वास बसणार नाही कि रंगकामासाठी वापरलेले पेंट शेणापासून बनवलेले आहे. यापुढे पंतप्रधान आवास योजना, सरकारी कार्यालये आदी ठिकाणी ब्रँडेड पेंटच्या जागी नैसर्गिक पेंटचा वापर केला जाईल, असेही केंद्रीय मंत्री गडकरी यांनी जाहीर केले.

(Start a business of making paint from dung, training for just Rs.5000)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *