महाराष्ट्र २४ ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – दि. १६ – सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे खाजगीकरण करण्यास विरोध म्हणून 15 व 16 मार्च 2021 रोजी बँकांच्या संघटनांनी पुकारलेला कामकाज बंद संप म्हणजे लोकशाही नुसार सरकारकडे आपली मागणी केलेल्याचा प्रयत्न आहे….यातून काय साध्य होईल…त्याचे काय परिणाम होतील…खाजगीकरण होणे थांबेल की नाही ह्याची काहीच शाश्वती नाही……मात्र त्या निमित्ताने एक गोष्ट लक्षात येत आहे की जनतेतील सार्वजनिक समस्यांचे गांभीर्य दिवसेंदिवस कमी कमी होत चालले आहे.
उदाहरणार्थ म्हटले तर देशातील शेतंकरीनी पुकारलेले आंदोलन असो कि आत्ताच व्यापारी संघटनांकडून पुकारण्यात आलेला बंद असो कि विद्यार्थीनी पुकारलेले आंदोलन असो कि मागे कामगार संघटनांनी पुकारलेले आंदोलन असो….हे सर्व पाहता जनतेतील महत्वाचे कारण असे वाटते की अनेक घटक आपापल्या पुरताच आवाज उठवतात……वास्तविक पाहता सामाजिक समस्या असो की सार्वजनिक क्षेत्रातील समस्या असोत….त्या कोना एका व्यक्तीच्या , घटकाच्या किंवा एखाद्या क्षेत्रापुरत्या मर्यादित नसतातच. त्यां समस्या-प्रश्न संपूर्ण जनतेचे असतात….परंतू माझ्यावर येईल तेव्हा बघू काय ते…आज माझ भागतय ना…बस झाल…अशी संकुचित मानसिकता दिवसेंदिवस जनतेत आढळून येत आहे…परीणामी संपाचे हत्यार बोथट होते आणि सरकार त्याचा फायदा घेतल्या शिवाय राहत नाही…कारण सरकारला त्यांची भुमिका कधीही चुकीची किंवा अयोग्य वाटत नाही…..
एकंदरीत दुरगामी विचार करण्याची वेळ आली आहे नाहीतर देशाची वाटचाल देशाच्या अधोगतीच्या मार्गाने कधी सुरू झाली हे जनतेला कळणार पण नाही…..म्हणून सार्वजनिक व सामाजिक प्रश्नांवर तरी सर्व जनतेने राजकारण, समाजकारण, स्वार्थ किंवा अहंकार वाजूला ठेवून देश हितासाठी एकत्र आले पाहीजे…..कारण सरकार सरकारची भूमीका देशहिताच्या दृष्टीकोनातून बरोबर आहे की चूक हे समजावून सांगण्याची देशातील प्रत्येक नागरीकाचे कर्तव्य आहे…..कर्तव्यदक्ष प्रजा असेल राजाला ही आपले कर्तव्य देशाच्या हितासाठीच बजवावे लागेल…कारण येणाऱ्या पुढच्या निवडणुकांची काळजी सरकारचा कारभार पाहणाऱ्यांना असतेच…..पि.के.महाजन.