महाराष्ट्र २४ ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – दि. १६ – नवीदिल्ली – मिनिस्ट्री ऑफ रेलवे (Ministry Of Railway) ने आपल्या ट्वीटमध्ये म्हटले, कोरोना संकट लक्षात घेता प्रवाशांना प्रवासापूर्वी विविध राज्यांनी दिलेली आरोग्य मार्गदर्शक तत्त्वे समजून घेण्याची विनंती केली जात आहे. वास्तविक, कोरोनाचा नवा स्ट्रेन आल्यानंतर अनेक राज्यात पुन्हा कडक लॉकडाऊन करण्यात आले आहे. संसर्ग नियंत्रित करण्यासाठी काही शहरांमध्ये नाईट कर्फ्यू लावण्यात आला असून लॉकडाऊन सारखी परिस्थिती आहे. बहुतेक राज्यांनी इतर राज्यांमधून येणार्या लोकांच्या प्रवेशासाठी निगेटीव्ह रिपोर्ट बंधनकारक केला आहे. अशा परिस्थितीत रेल्वेही प्रवाशांच्या सुरक्षेसाठी अधिक दक्षता घेत आहे.
अलीकडे, पूर्व मध्य रेल्वेने दिल्ली-मुंबईतून बिहारकडे जाणाऱ्या प्रवाश्यांसाठी विशेष एडवायजरी जाहीर करण्यात आले आहे. मुंबई किंवा देशातील इतर राज्यांमधून बिहारमध्ये होळीला येण्यासाठी येणाऱ्या सर्व प्रवाश्यांनी केवळ थर्मल स्कॅनिंगच नव्हे तर सर्व प्रवाशांना मास्क घालणे बंधनकारक करण्यात आले आहे.
रेल्वेच्या म्हणण्यानुसार, ट्रेनमध्ये प्रवास करण्यापूर्वी प्रवाश्यांनी ज्या राज्यात जात आहेत तिथली मार्गदर्शक तत्त्वं जाणून घेतली पाहीजेत. यावेळी प्रत्येक राज्यात राज्य सरकारकडून वेगवेगळी मार्गदर्शक तत्त्वे जाहीर करण्यात आली आहेत. काही राज्यांत, प्रवेशासाठी आरटी-पीसीआर निगेटीव्ह चाचणी अहवाल दाखवणे बंधनकारक आहे. प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी आणि कोरोनाबरोबर एकत्र लढण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आलंय.