1 एप्रिलपासून नोकरदारांच्या कामाचे तास वाढणार?

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – दि. १६ – मुंबई – देशात लवकरच नव्या कामगार नियमांची अंमलबजावणी केली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे नोकरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या कामाची कमाल कालमर्यादा 12 तासांपर्यंत वाढवली जाऊ शकते, अशी चर्चा सुरु होती. यावरुन अनेक उलटसुलट तर्कवितर्क लढवले जात होते. सध्याच्या नियमांनुसार कामाची कमाल मर्यादा 10.5 तास इतकी आहे. (Government clerifies working hours increases or not)

आंतरराष्ट्रीय स्तरावरील कामगार संघटनांबाबत बोलायेच झाल्यास, औद्योगिक मजुरांकडून दिवसाला आठ तास तर आठवड्याला 48 तास काम करवून घेता येते. ज्याठिकाणी कामाच्या एका पाळीनंतर दुसऱ्या पाळीची (Shift) पद्धत आहे त्याठिकाणी ही कालमर्यादा 56 तास इतकी आहे. तीन आठवड्यांमध्ये कर्मचाऱ्यांच्या कामाच्या तासाची दैनंदिन सरासरी आठ तास इतकी असली पाहिजे.

केंद्रीय कामगार मंत्री संतोष गंगवार यांनी नुकतेच कामगार कायद्याबाबत स्पष्टीकरण दिले. 1948च्या कारखाना कायद्यातील कामकाजाचे तास वाढवण्याचा कोणताही प्रस्ताव केंद्र सरकारने मंजूर केलेला नाही. देशातील नोंदणीकृत कार्यालयांमध्ये 1948च्या कारखाना कायद्यानुसार कामाचे तास निश्चित केले जातात.गेल्यावर्षी कोरोना काळात काही राज्यांनी केंद्र सरकारकडे कामकाजाचे तास वाढवण्याची मागणी केली होती. मात्र, कामगार मंत्रालयाने हा प्रस्ताव स्पष्टपणे फेटाळून लावल्याचे संतोष गंगवार यांनी स्पष्ट केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *