तिन्ही फॉरमॅटमध्ये अव्वल पाचमध्ये स्थान मिळवणारा एकमेव क्रिकेटपटू विराट

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – दि. १८ – अहमदाबाद – इंग्लंडविरुद्धच्या टी-ट्वेन्टी मालिकेतील सलग दोन नाबाद अर्धशतकांनंतर भारताचा कर्णधार विराट कोहलीच्या आयसीसी टी-ट्वेन्टी क्रमवारीत वाढ झाली आहे. ताज्या क्रमवारीत त्याने पाचव्या स्थानी झेप घेतली. तिन्ही क्रिकेट फॉरमॅटमध्ये अव्वल पाचमध्ये स्थान मिळवणारा विराट हा जगातील एकमेव क्रिकेटपटू आहे.

दुस-या आणि तिस-या टी-ट्वेन्टी लढतीत नाबाद ७३ आणि नाबाद ७७ धावा फटकावणा-या कोहलीने ४७ रेटिंग गुणांची कमाई करताना ‘टॉप फाइव्ह’मध्ये प्रवेश केला. सध्या त्याचे पाचवे रँकिंग आहे. विराट हा कसोटी आणि वनडे क्रमवारीत अव्वल स्थानी आहे. इंग्लंडचा अनुभवी फलंदाज जोस बटलरने तिस-या सामन्यात ८३ धावांची ‘मॅचविनिंग’ खेळी केल्याने तो थेट १९व्या स्थानी पोहोचला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *