महाराष्ट्र २४ ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – दि. १८ – मुंबई – सोन्याचांदीच्या किंमतीमध्ये (Gold-Silver Price ) पुन्हा एकदा उसळी पाहायला मिळते आहे. 18 मार्च रोजी एक तोळा सोन्याचे दर 120 रुपयांनी वाढले आहेत. गुरुवारी सकाळी MCX (मल्टी कमोडिटी एक्सचेंज) वर सोन्याच्या दरात प्रति ग्रॅम 12 रुपयांची वाढ झाली आहे. आज भारतात 22 कॅरेट सोन्याचे दर 43,960 रुपये प्रति तोळा आहे. जाणून घ्या तुमच्या शहरात काय आहेत सोन्याचे दर. सोन्याचे दर प्रत्येक शहरात वेगळे आहेत कारण सोन्याच्या आणि चांदीच्या दागिन्यांवर एक्साइज ड्युटी आणि राज्याकडून कर आकारला जातो.
सोन्याची तुमच्या शहरातील किंमत (22 कॅरेट)
मुंबई – 43,960 रुपये
पुणे- 43,960 रुपये
24 कॅरेट सोन्याची किंमत
मुंबई – 44,960 रुपये
पुणे- 44,960 रुपये
आणखी वाढणार सोन्याचे दर ;तज्ज्ञांच्या मते पुन्हा एकदा सोन्याच्या दरात तेजी येऊ शकते. भारतात लग्नसराईच्या काळात आता सोन्याचांदीच्या किंमतींला सपोर्ट मिळत आहे. त्यामुळे सध्याच्या सोन्याच्या किंमती असताना तुम्ही गुंतवणूक केली तर फायद्याचं ठरू शकतं. तज्ज्ञांच्या मते 2021 साली सोन्याच्या किंमतीमध्ये आणखी वाढ होऊ शकते. असा अंदाज व्यक्त करण्यात येतो आहे की सोन्याच्या दरात 63,000 रुपयांपर्यंत वाढ होऊ शकते.