महाराष्ट्र २४ ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – दि. १८ – नवीदिल्ली – केंद्र सरकार लवकच ज्येष्ठ नागरिकांना (Senior Citizen) काम मिळवून देणारी योजना आणणार आहे. सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी यासंदर्भात राज्यसभेत घोषणा केली. या योजनेच्या माध्यमातून देशातील वृद्धांची आर्थिक स्थिती मजबूत करण्याचा सरकार प्रयत्न करेल. राज्यसभेत रामदास आठवले यांनी प्रश्नोत्तराच्या वेळी उत्तर देताना ही माहिती दिली. सेवानिवृत्त लोक आणि अन्य गरजू वृद्धांना काम देण्यासाठी ही योजना असेल.
देशातील वृद्धांची आर्थिक स्थिती मजबूत करणे हे या योजनेचे उद्दीष्ट आहे. देशात 600 पेक्षा जास्त निवारा घरे असून त्यातील 30,000 हून अधिक वयोवृद्ध आहेत. या निवारा गृहांमधील वृद्धांच्या पोषण आहाराचीही व्यवस्था केली आहे. येथे जेवणाबरोबर वृद्धांना आरोग्य सुविधा देखील पुरविल्या जातात असे आठवले म्हणाले.