चांदीचा भाव गडगडला ; सोन्याच्या किमतीत घट , पहा किती रुपयांनी स्वस्त झालं

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – मुंबई – दि. २२ मार्च – कमॉडिटी बाजारात सोने आणि चांदीच्या दरातील घसरण थांबण्याची चिन्हे नाहीत. सोने आणखी किती स्वस्त होणार याचा जाणकारांना देखील अंदाज लावणे कठीण झाले आहे. आज सोमवारी कमॉडिटी बाजार उघडताच सोने दरात आणि चांदीच्या किमतीत घसरण झाली. सोने २५० रुपयांनी तर चांदी १४०० रुपयांनी स्वस्त झाले आहे.

आज सोमवारी मल्टी कमॉडिटी बाजारात सोन्याचा भाव ४४७६९ रुपये आहे. त्यात २५२ रुपयांची घसरण झाली आहे. एक किलो चांदीचा भाव ६६१८० रुपये आहे. त्यात १३४७ रुपयांची घसरण झाली आहे. तत्पूर्वी सोने ४४७२० रुपयांपर्यंत घसरले होते.

good returns या वेबसाईटनुसार आज सोमवारी मुंबईत २२ कॅरेट सोन्याचा भाव ४३९१० रुपये इतका खाली आला आहे. २४ कॅरेट सोन्याचा भाव ४४९१० रुपये आहे. दिल्लीत २२ कॅरेट सोन्याचा भाव ४८३८० रुपये झाला आहे. २४ कॅरेटसाठी सोन्याचा भाव ४८४४० रुपये झाला आहे. चेन्नईत २२ कॅरेटसाठी ४२४९० रुपये असून २४ कॅरेटचा भाव ४६३५० रुपये आहे. कोलकात्यात २२ कॅरेट सोन्याचा भाव ४४५४० रुपये असून २४ कॅरेट सोन्याचा भाव ४७२१० रुपये आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *