पाठवलेला मेसेजही एडिट करता येणार ; टेलिग्रामचे नवीन युनिक फीचर्स,

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – दि. २८ – पुणे – जगातील सर्वात लोकप्रिय अॅप्सपैकी एक म्हणजे व्हॉट्सअ‍ॅप आपल्या नवीन प्रायव्हसी पॉलिसीबाबत सध्या वादात आहे. लोकांचे मत आहे की व्हॉट्सअ‍ॅपची नवीन पॉलिसी सुरक्षित नाही आणि ते पर्याय शोधत आहेत. टेलिग्राम हा देशात व्हॉट्सअ‍ॅपचा आवडता पर्याय बनत आहे. त्याच्या वापरकर्त्यांची संख्या सतत वाढत आहे. टेलिग्राम देखील त्याच्या लोकप्रियतेनुसार फीचर्स अपडेट करत आहे. टेलिग्रामचं मेसेज एडिटिंग फीचर युनिक आहे. या फीचरनुसार, एखाद्या युजरला मेसेज केल्यानंतर आपण तो मेसेज पुन्हा एडिट करु शकतो. व्हॉट्सअ‍ॅपवर हे फीचर उपलब्ध नाही. टेलिग्रामचं हे फीचर लोकांना फारच आवडत आहे.

अनलिमिटेड स्टोरेज ; टेलीग्राम अ‍ॅपमध्ये आपल्याला अमर्यादित स्टोरेज उपलब्ध आहे. ज्यामध्ये आपण आपला डेटा स्टोअर करू शकता. एवढंच नाही तुम्ही तुमचा डेटा कुठेही सहज अॅक्सेस करु शकता. टेलीग्रामचे हे फीचर प्रोफेशनल लाईफमध्ये खूप उपयुक्त ठरू शकते. टेलिग्राम व्यतिरिक्त या प्रकारची सुविधा इतर अ‍ॅप्समध्ये उपलब्ध नाही. मोठ्या फाईल्स शेअर करण्याची क्षमता ; टेलीग्रामवर आपण 1.5 जीबीपर्यंत फाईल्स शेअर करू शकता. टेलीग्रामचं हे एक महत्त्वाचं फीचर आहे. जे इतर कोणत्याही अॅपपेक्षा चांगले आहे. आपण हे फीचर प्रोफेशनल लाईफमध्ये वापरू शकता. टेलिग्राम अनेक बाबतीत अत्यंत अॅडवान्स आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *