पुण्यात मोजके नागरिक रस्त्यावर ; पहिल्याच दिवशी दिसला ‘नाईट कर्फ्यू’चा इफेक्ट

Spread the love

Loading

महाराष्ट्र 24 । ऑनलाईन । विशेष प्रतिनिधी । पुणे । दि. २९ मार्च । पुण्यात पहिल्याच दिवशी जमावबंदीच्या नव्या नियमांअंतर्गत लागू करण्यात आलेल्या सुचनांचे कडेकोटपणे पालन होताना दिसलं. सर्वच दुकानांची शटर्स आठच्या आतच बंद करण्यात आल्याचं पहायला मिळाल.आठनंतर रस्त्यावर अगदी मोजके नागरिक दिसून येत होते.पुण्यामध्ये रस्त्यावरही मोजकी वाहतूक दिसून येत होती. करोनाचे रुग्ण वाढल्याने राज्यात रविवारी (२८ मार्च २०२१ ) मध्यरात्रीपासून १५ एप्रिलपर्यंत सर्वत्र रात्रीची जमावबंदी लागू करण्यात आली आहे. या जमावबंदीचा प्रभाव पहिल्याच दिवशी पुण्यामध्ये दिसून आला. या जमावबंदीमध्ये पाच किंवा त्यापेक्षा अधिक लोकांनी रात्री ८ ते सकाळी ७ या वेळेत एकत्र येण्यास बंदी आहे.

दुकाने, उपाहारगृहे, मॉल्स, चित्रपटगृहे, सागरी किनारे, बगीचे, उद्याने रात्री ८ वाजताच बंद करण्याच्या सुचना करण्यात आल्या असून पहिल्याच दिवशी या सुचनांचे कडोकोटपणे पालन होताना पुण्यात दिसून आलं.उपाहारगृहे, सिनेमागृहे, सभागृह यांनी नियमभंग केल्यास त्यांना करोनाची साथ संपेपपर्यंत टाळे ठोकण्याचे आदेश मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी सर्व जिल्हा, पालिका आणि पोलीस प्रशासनास दिले आहेत. मुंबईबरोबरच पुणे महानगर प्रदेश, नागपूर, नाशिक, औरंगाबाद, नांदेड आदी जिल्ह्यात करोनाचा उद्रेक होत असल्याच्या पाश्र्वाभूमीवर राज्यात पुन्हा एकदा टाळेबंदी करण्याची मागणी स्थानिक प्रशासनाकडून होत आहे. सरसकट टाळेबंदी लागू केली जाणार नसली तरी काही निर्बंघ नव्याने लागू करण्यात आले आहेत.

स्थानिक पातळीवर टाळेबंदीसारखे कठोर निर्बंध किं वा तत्सम कठोर उपाययोजना करण्याची मुभा जिल्हाधिकारी, पालिका आयुक्तांना देण्यात आली आहे. मुख्य सचिवांची लेखी परवानगी घेऊनच संचारबंदी किं वा टाळेबंदीसारखे निर्बंध लागू करता येतील, असे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी आदेशात स्पष्ट केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *