बिना मास्क फिरणाऱ्या मजूर , गरीब कामगार वर्गास दंडाची रक्कम कमी करावी ; अमित गोरखे

Spread the love

Loading

महाराष्ट्र 24 । ऑनलाईन । विशेष प्रतिनिधी । पिंपरी-चिंचवड । दि. २९ मार्च । पिंपरी-चिंचवड मध्ये कोरोनाचं थैमान सुरुच आहे. कोरोनाचा संसर्ग आता हाताबाहेर जातांना दिसत आहे. लोकांकडून नियमांचं पालन होत नाहीये. शहरात गेल्या काही दिवसांपासून वाढलेला आकडा हा फक्त प्रशासनासाठीच नाही तर शहरातील नागरिकांसाठी ही धोक्याची घंटा आहे. वारंवार आवाहन करुन इशारा देऊनही लोकांमध्ये कुठलही गांभीर्य आलेलं दिसत नाहीये. लोक विना मास्क बाहेर पडत आहेत, सध्या कोरोना ची परिस्थिती बिकट असून प्रशासनाने केलेला बिना मास्क फिरणारयासाठीं कार्यवाही करण्याचा निर्णय अतिशय चांगला आहे ,सध्या पोलिसांमार्फत ही कार्यवाही चांगल्या पद्धतीने चालू आहे,

परंतु पिंपरी-चिंचवडमध्ये अनेक मजूर गरीब, कामगार वर्ग दिवसभराचे काबाड कष्ट करून आलेला असतो, अशा परिस्थितीत अशा गरीब जनतेला ५०० रुपये दंड हा अतिशय जास्त होतो असे वाटते, हा दंड जरूर घ्यावा पण दंडाची रक्कम ५०० रुपये ऐवजी दोनशे रुपये करावी ,जेणेकरून गरीब मोलमजुरी करणाऱ्या लोकांना याचा फटका बसणार नाही ,अशी मागणी भाजपचे प्रदेश सचिव श्री अमित गोरखे यांनी माननीय आयुक्त पिंपरी चिंचवड मनपा व माननीय पोलीस कमिशनर पिंपरी चिंचवड यांना पत्राद्वारे केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *