महाराष्ट्र 24 । ऑनलाईन । विशेष प्रतिनिधी । पुणे । दि. २९ मार्च । देशात लग्न हंगामात सोन्याला (latest Gold rate) विशेष महत्व प्राप्त होते. परंतु, गुंतवणूक (gold Investment) म्हणून सोनं हा उत्तम पर्याय आहे. सध्या सोन्याच्या दरात सातत्याने घट होताना दिसत आहे. आतापर्यंत सोन्याचे दर निचांकी म्हणजेच १२००० रुपयांनी घटले आहेत. शनिवारी २२ कॅरेट सोन्याचा दर ४३,००० रुपये प्रति १० ग्रॅम होता तर २४ कॅरेट सोन्याचा दर ४५,००० रुपये प्रति १० ग्रॅम होता , त्यामुळे अशा स्थितीत तुम्ही सोन्यामध्ये गुंतवणूक करण्याचा विचार नक्की करू शकता.
गुड रिटर्न वेबसाईट नुसार आज सोन्याचा भाव २२ कॅरेट सोन्याचा दर ४२,९८० रुपये प्रति १० ग्रॅम होता तर २४ कॅरेट सोन्याचा दर ४३,९८० रुपये प्रति १० ग्रॅम आहे . तर चांदी च्या भावात १००० ची वाढ होऊन प्रति किलो ६५,७०० /रु. प्रति किलो आहे .
तज्ज्ञांच्या अंदाजानुसार, सोन्याच्या किमती लवकरच वाढू शकतात.हे. तर येत्या 2 महिन्यात चांदीचे दर 70,000 ते 72,000 रुपयांदरम्यान असतील. अन्य अभ्यासकांच्या मते सोन्याच्या दरात मोठी तेजी येण्याची शक्यता असून हे दर 45,000 रुपयांवरुन 48,000 रुपयांवर पोहोचतील. मागील वर्षी म्हणजेच मार्च 2020 मध्ये सोने 38,800 रुपये प्रति 10 ग्रॅम होते. आता हेच दर 45,000 रुपयांपर्यंत आहेत. म्हणजेच सोन्यातून एका वर्षात सुमारे 17 टक्के रिटर्न मिळाला आहे. तसेच मागील 5 वर्षात सोन्यातून 61 टक्के रिटर्न मिळाला आहे. मार्च 2016 मध्ये सोन्याचे दर 28,000 रुपये प्रति 10 ग्रॅम होते.