महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – दि. २८ – मुंबई – देशात सलग आठराव्या दिवशी कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ कायम राहिली. मागील २४ तासात रुग्णसंख्येत तब्बल ६२ हजार ७१४ ने भर पडली. मागील पाच महिन्यातील ही सर्वाधिक रुग्णवाढ आहे. ३१२ जणांचा मृत्यू झाला. मृतांचा हा आकडा मागील तीन महिन्यांमधील उच्चांकी आहे. २८ हजार ७३९ रुग्ण बरे झाले आहेत, अशी माहिती आरोग्य मंत्रालयाने रविवारी दिली. दरम्यान, महाराष्ट्रातील रुग्णवाढ सर्वाधिक असून, राज्यात मागील २४ तासांमध्ये ३५ हजार ७२६ नवे रुग्ण आढळले. तर १६६ जणांचा मृत्यू झाला आहे.
कोरोनामुळे आतापर्यंत 1 लाख 61 हजार ५५२ जणांचा मृत्यू झाला आहे. तर 1 कोटी 1३ लाख २३ हजार ७६२ लोक बरे झाले आहेत. सध्या ४ लाख, ८६ हजार ३१० रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर ६ कोटी, २ लाख, ६९ हजार ७८२ जणांचे लसीकरण करण्यात आले आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.
16 सप्टेंबर 2020 रोजी कोरोना रुग्णसंख्या वाढीचा आकडा 50 लाखांवर गेला होता. 19 डिसेंबर 2020 रोजी रुग्णसंख्येने एक कोटीचा आकडा ओलांडला होता. दरम्यानच्या काळात रुग्णांची व मृतांची संख्या झपाट्याने कमी होत झाली. मात्र गेल्या १८ दिवसांपासून संसर्ग अत्यंत वेगाने वाढत आहे.