महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – दि. २८ – पुणे – गेल्या काही दिवसांपासून हिंदुस्थानात सोने आणि चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण झाल्याचे दिसून आले आहे. या महिन्याभरात सोन्याच्या दरात 1800 रुपयांनी घसरण झाल्याचे दिसून आले आहे. सराफा बाजारातही सोन्याच्या दरात 760 रुपयांची घसरण नोंदविण्यात आली आहे. परिणामी २४ कॅरेट सोन्याचा दर ४४००० रुपये इतका झाला आहे. गोल्ड रिर्टन या वेबसाईटच्या माहितीनुसार आज २४ कॅरेट सोन्याचा दर ४३,९९० रुपयांपर्यंत पोहचला असून २२ कॅरेट सोन्यासाठी ग्राहकांना ४२,९९० रुपये मोजावे लागणार आहेत. सलग ४ दिवस सोन्याच्या भावात घट पहायला मिळत आहे .