महाराष्ट्र 24 । ऑनलाईन । विशेष प्रतिनिधी । मुंबई । दि. २९ मार्च । सध्याला सोन्याचे दर परवडणारे असून अनेकांचा सोने किंवा दागिने खरेदी करण्याकडे कल वाढतो आहे. सोन्याची मागणी आर्थिक वर्ष 2022 मध्येही 30 ते 35 टक्के इतकी वाढलेली दिसणार असल्याचा अंदाज इंडिया रेटिंग्ज अँड रिसर्च संस्थेने व्यक्त केलाय. आर्थिक वर्ष 2021 मध्ये तिसऱया तिमाहीत उत्सवामुळे दागिन्यांच्या मागणीत गती दिसली होती. लग्नसमारंभ व इतर कार्यक्रमांमुळे सोन्या, चांदीच्या दागिन्यांना पसंती दिसून आली. सोन्याच्या दरात झालेल्या घसरणीमुळे येत्या काळात दागिन्यांच्या मागणीत वाढ दिसणार आहे.