महाराष्ट्र 24 । ऑनलाईन । विशेष प्रतिनिधी । पिंपरी चिंचवड । दि. २९ मार्च । उच्चालक संकल्पचित्र व निर्मिती विभाग व उपविभाग दापोडी यांचे कोलाड, पेन, पालघर येथे स्थलांतरीत करण्याचे आदेश नाशिक जलसंपदा विभागामार्फत २६ मार्च २०२१ला करण्यात आले. त्याची अंमलबजावणी १ एप्रिल २०२१ पासून करण्यात येणार आहे . तरी हे स्थलांतरण रायगड जिल्ह्यात एवढ्या मोठ्या स्वरूपाची कामे उपलब्ध नसताना करणे हे अन्यायकारक आहे .
सदर विभाग हा संपूर्ण महाराष्ट्र भरतील धरणांवरील लागणाऱ्या उच्चालकांचे संकल्पना करणे व त्या नुसार विभागातील उपलब्ध उपविभागामार्फत त्याची निर्मिती करणे व सद्य स्थितीत त्याची दुरुस्ती कामे करणे अशा स्वरुपाची कामे १९६६ पासून गुणवंतापुर्वक पणे करत आहे , २००६ / ०७ मध्ये सदर विभागास महाराष्ट्र शासनाचा मुख्यमंत्री पुरस्कार मिळालेला आहे , २०१७ -१८ मध्ये को. प . बंधाऱ्याचे बर्गे विभागाच्या कर्म शाळेतच निर्मिती करून पाणी साठा करण्यात मोलाचा सहभाग नोंदवला आहे .उच्चलकांचे कामासोबतच मातीकाम कालवा स्वच्छतेची विशेष उल्लेखनीय कामगिरी या विभागाने केली आहे
रायगड जिल्ह्यातील यांत्रिकी कामाच्या सुसुत्रीकरणाच्या अनुषंगाने कार्यरत आस्थापन स्थलांतरीत करून कामामधील सुसूत्रता संपूर्णपणे विस्कळीत होईल ,
तसेच रायगड जिल्हातील कामे इतर यांत्रिकी विभाग करत असताना या विभाग उपविभागाचे स्थलांतरण करून सादर कामात अडथळा निर्माण केल्या सारखे व विभागाच्या कार्यप्रणालीत कर्मचारी अधिकारी यांच्या मानसिकतेत विषण्णता निर्माण करण्यासारखे आहे अशा भावना सर्व अधिकारी कामगार व कर्मचारी यांनी व्यक्त केल्या
तसेच या कार्यालयास प्राप्त अध्यदेश व स्थलांतर करण्याचा दिनांक यात फक्त २ दिवसांचा अवधी असून एवढ्या कमी कालावधीत उपरोक्त कार्यवाही करणे शक्य होणार नाही तसेच रायगड जिल्ह्यात कोणत्याही प्रकल्पाची यांत्रिकी स्वरूपाची कामे सुरु नसतांना सदर विभाग व त्याचे तीन विभाग स्तलांतरित करणे हे शासकीय हिताचे होणार नाही ,तरी या कार्यालयांचे स्थलांतरण करून नये अशी मागणी अधिकारी / कर्मचारी व कामगार यांनी केली . व तसे निवेदन ही आमदार अण्णा बनसोडे यांना दिले .