महाराष्ट्र 24 । ऑनलाईन । विशेष प्रतिनिधी । मुंबई । दि. २९ मार्च ।नव्या आर्थिक वर्षाला १ एप्रिलपासून सुरुवात होतेय. यंदाच्या एप्रिल महिन्यात देशातील बँका तब्बल १५ दिवस बंद राहणार आहेत. एप्रिलमध्ये विविध सुट्ट्यांमुळे ९ दिवस आणि महिन्याच्या दुसऱ्या व चौथ्या शनिवारी बँका असतात या सर्व सुट्ट्या पकडून एप्रिल महिन्यात बँका १५ दिवस बंद राहणार आहेत.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या (RBI) संकेतस्थळावरील माहितीनुसार, एप्रिल महिन्यात गुड फ्रायडे, राम नवमी, बिहू, बाबू जगजीवन राम यांचा जन्मदिन, तामिळ नववर्ष आणि इतर काही सणांचा समावेश आहे. याच्या बँकांच्या सुट्ट्या असणार आहेत. शिवाय एप्रिलच्या कामाची सुरुवात ३ एप्रिलपासून होणार आहे. १ आणि २ एप्रिल रोजी बँकांमध्ये काम होणार नाहीय. ३१ मार्च रोजी बँकांना सुट्टी नाही. मात्र, आर्थिक वर्ष संपत असल्याने इयर एडिंगच्या कामांसाठी बँकेचे दैनंदिन कामकाज बंद राहणार आहे. त्यामुळे ग्राहकांना व्यवहार करण्यासाठी ३० मार्च आणि ३ एप्रिल हे फक्त दोन दिवस उपलब्ध असणार आहेत.
एप्रिलमध्ये नेमकं कोणकोणत्या दिवशी बँका राहणार बंद?
# १ एप्रिल- आर्थिक वर्ष संपत असल्याने दैनंदिन कामकाज होणार नाही.
# २ एप्रिल – गुड फ्रायडेची सुट्टी असल्यामुळे बँका बंद राहतील.
# ५ एप्रिल – बाबू जगजीवन राम यांच्या जन्मदिनाच्या पार्श्वभूमीवर हैदराबादमध्ये बँका बंद राहतील.
# ६ एप्रिल- तामिळनाडू विधानसभा निवडणुकीसाठीचा मतदानाचा दिवस आहे. त्यामुळे चेन्नईतील खासगी आणि सरकारी बँकांमध्ये कामकाज होणार नाही.
# १३ एप्रिल- गुडी पाडवा, तेलगू नववर्ष, उगाडी पर्व, साजिबू नोंगमापनबा (चीरोबा), पहली नवरात्रच्या पार्श्वभूमीवर बेलापुर, बंगळुरू, चेन्नई, हैदराबाद,
इम्फाळ, जम्मू-कश्मीर, मुंबई, नागपुर, पणजी आणि श्रीनगरमध्ये बँका बंद राहतील.
# १४ एप्रिल- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती
# १५ एप्रिल- हिमाचल दिवस, बंगाली न्यू ईयर डे, बोहाग बिहू, सरहुलच्या पार्श्वबूमीवर अगरताळा, गुवाहटी, कोलकाता, रांची आणि शिमलामध्ये बँका बंद
राहतील.
# १६ एप्रिल- बोहाग बिहूच्या निमित्ताने गुवाहटीमध्ये बँका बंद राहणार आहेत.
# २१ एप्रिल- राम नवमी आणि गरिया पूजाच्या निमित्तानं अगरताळा, अहमदाबाद, बेलापुर, भोपाळ, भुवनेश्वर, देहरादून, गंगटोक, हैदराबाद, जयपुर,
कानपुर, लखनऊ, मुंबई, नागपुर, पाटणा, रांची आणि शिमलामध्ये बँका बंद राहणार आहेत.
रविवार सोबतच दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी बँकांची सुटी असते. त्यामुळे ४,११,१८ आणि २५ एप्रिल रोजी रविवारच्या सुटीनिमित्त बँका बंद असतील तर
१० एप्रिल आणि २४ एप्रिल रोजी अनुक्रमे दुसरा आणि चौथा शनिवारी असल्यानं या दिवशी बँकांना सुटी असणार आहे.
दरम्यान, सुट्टीमध्ये बँकां बंद राहणार असल्या तरी मोबाइल आणि इंटरनेट बँकिंग सुविधा नेहमीप्रमाणे सुरू राहणार आहे. ग्राहकांना ऑनलाइन बँकिंगच्या माध्यमातून आपली कामं करता येतील.