Deprecated: Function WP_Dependencies->add_data() was called with an argument that is deprecated since version 6.9.0! IE conditional comments are ignored by all supported browsers. in /home/x5zz1zyaiadw/public_html/wp-includes/functions.php on line 6131
पुण्यातील धायरी परिसरातील कारखान्याला आग ; फायर ब्रिगेडच्या गाड्या घटनास्थळी. - Maharashtra 24

पुण्यातील धायरी परिसरातील कारखान्याला आग ; फायर ब्रिगेडच्या गाड्या घटनास्थळी.

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – पुणे – दि. ३१ – पुण्यातील धायरी येथे अभिनव कॉलेज परिसरातील एका कारखान्याला आग लागली आहे. पार्टी पॉप्स बनवण्याचा हा कारखाना आहे. फायर ब्रिगेड कडून आग विझविण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.

पुणे शहरामध्ये आगीच्या घटनांचे सत्र थांबायला तयार नाही. आज सकाळी सव्वा अकराच्या सुमारास धायरी येथील अभिनव कॉलेज रस्ता या परिसरातील एका कंपनीमध्ये आग लागली आहे. या ठिकाणी कागद पुठ्ठा अशा अनेक गोष्टी असल्याने आग वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. पुणे शहरातील तसेच पी एम आर डी ए च्या फायर ब्रिगेडच्या ६ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.

घटनास्थळी पोहोचलेले अग्निशमन दलाचे जवान आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करीत आहेत ‌. मात्र या परिसरात बघा यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केलेली असल्याने आग विझवण्यात अडचणी येत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *