Deprecated: Function WP_Dependencies->add_data() was called with an argument that is deprecated since version 6.9.0! IE conditional comments are ignored by all supported browsers. in /home/x5zz1zyaiadw/public_html/wp-includes/functions.php on line 6131
‌कच्चे तेल झाले स्वस्त ; पेट्रोल आणि डिझेल दर उतरणार का ? - Maharashtra 24

‌कच्चे तेल झाले स्वस्त ; पेट्रोल आणि डिझेल दर उतरणार का ?

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – नवीदिल्ली – दि. ३१ -जागतिक बाजारात कच्च्या तेलाचा किमतीत घसरण होत आहे. त्यामुळे पेट्रोलियम कंपन्यांनी मंगळवारी इंधन दर कपात केली होती. आज मात्र बुधवारी कंपन्यांनी इंधन दर स्थिर ठेवले. पेट्रोल आणि डिझेलची किंमत आज जैसे थेच आहे.

सलग चार दिवस इंधन दर स्थिर ठेवल्यानंतर पेट्रोलियम कंपन्यांकडून मंगळवारी पेट्रोल आणि डिझेलचा दर कमी केला होता. तर आज इंधन दर स्थिर ठेवेल. आज बुधवारी मुंबईत पेट्रोलचा भाव ९६.९८ रुपये आहे. डिझेलचा भाव ८७.९६ रुपये आहे. दिल्लीत आज एक लीटर पेट्रोल ९०.५६ रुपये आहे. डिझेलचा भाव ८०.८७ रुपये झाला आहे. चेन्नईत आजचा पेट्रोलचा भाव ९२.५८ रुपये झाला आहे. डिझेलसाठी ८५.८८ रुपये भाव आहे.

आज बुधवारी कोलकात्यात पेट्रोलचा भाव ९०.७७ रुपये झाला आहे. डिझेलचा भाव ८३.७५ रुपये आहे. बंगळुरात पेट्रोल ९३.५९ रुपये असून डिझेल ८५.७५ रुपये झाला आहे. मध्य प्रदेशातील भोपाळमध्ये आतापर्यंतचा डिझेलचा सर्वाधिक ८९.१३ रुपयांचा विक्रमी दर आहे. तर पेट्रोल दर ९८.५८ रुपये आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *