महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – विशेष प्रतिनिधी – मुंबई – दि. ३१ – शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचं आज भूमिपूजन होणार आहे. या भूमिपूजनाचं अनेक दिग्गज नेत्यांना निमंत्रण देण्यात आलेलं नाही. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनाही निमंत्रण देण्यात आलेलं नाही. त्यामुळे मनसेचा संताप उडाला असून मनसेने शिवसेनेवर टीकाही केली आहे. (mns slams shivsena over Thackeray Memorial Bhumi Pujan Ceremony)
मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी ट्विट करून शिवसेनेवर शरसंधान साधलं आहे. बाळासाहेबांचे विचार खऱ्या अर्थाने पुढे नेण्याचं काम हे राजसाहेबच करत आहेत, हीच मराठी माणसाची भावना आहे. आणि तिच महत्वाची. बाकी भूमिपूजन कोण करतंय महत्वाचं नाही, असा टोला संदीप देशपांडे यांनी लगावला आहे.
स्वर्गीय मा.बाळासाहेबांचे विचार खऱ्या अर्थाने पुढे नेण्याचं काम हे राजसाहेबच करत आहेत हीच मराठी माणसाची भावना आहे. आणि तीच महत्वाची. बाकी भूमिपूजन कोण करतंय महत्वाचं नाही.
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) March 31, 2021