फेब्रुवारीत 100 रुपयांनी महागलेल्या गॅस सिलिंडर दरात 10 रुपयांनी कपात

Spread the love

Loading

महाराष्ट्र 24 । ऑनलाईन । विशेष प्रतिनिधी । नवीदिल्ली । दि. १ एप्रिल । डिसेंबर महिन्यापासून सातत्याने वाढत असलेल्या गॅस सिलिंडर दरवाढीला एप्रिल महिन्यात लगाम लागला आहे. एलपीजी गॅस सिलिंडर दरात 10 रुपयांनी कपात करण्याची घोषणा इंडियन ऑईल कॉर्पोरेशनने बुधवारी केली. त्यानुसार 1 एप्रिलपासून सुधारित दरांची अंमलबजावणी होणार आहे. मार्च अखेरपर्यंत ग्राहकांना प्रतिसिलिंडर 819 रुपये मोजावे लागत होते. त्यामध्ये 10 रुपयांची कपात झाल्याने आता 809 रुपयांना सिलिंडर उपलब्ध होणार आहे. हा दर दिल्लीमधील असून वेगवेगळय़ा शहरांनुसार दर आकारणीमध्ये किरकोळ बदल असू शकतात. गेल्या काही दिवसात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीतही घट सुरू झाल्यामुळे वाहनधारकांना किंचित दिलासा मिळाला आहे.

मार्च महिन्याच्या प्रारंभीच देशांतर्गत एलपीजी गॅस प्रतिसिलिंडर 25 रुपयांनी वाढल्याने सर्वसामान्यांना मोठा दणका बसला होता. फेब्रुवारीतही एलपीजी गॅसच्या किंमतीत तीनवेळा वाढ झाल्याने सिलिंडर 100 रुपयांनी महागला होता. एकंदर फेब्रुवारी-मार्चमध्ये एलपीजी सिलिंडर 125 रुपयांनी महाग झाला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *